Top News

खणदाळ प्रशालेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा



सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क :

गडहिंग्लज तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, खणदाळ येथे २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थी कुमार प्रथमेश जाधव याने शिस्तबद्ध पदसंचलन करत मान्यवरांना मानवंदना दिली. त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण हिरेमग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी झेंडा गीत व महाराष्ट्र गीत सादर करून संपूर्ण परिसर देशभक्तीमय केला.

यावेळी विद्यार्थ्यांनी समूहगीत, घोषणाबाजी तसेच पदसंचलनाचे सादरीकरण अत्यंत उत्कृष्टरीत्या केले. कार्यक्रमात अण्णासाहेब सुतार यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करत संविधानाची मूल्ये, शिस्त आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक सुदर्शन पाटील, धर्म गोंडा पाटील उपस्थित होते. तसेच विजया सूर्यवंशी, धोंडीबा जाधव, आप्पासो कोणूरी यांनी सहकार्य केले. देणगीदार शिवाप्पा कोणूरी यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती.

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. संपूर्ण कार्यक्रम शांततामय व आनंदी वातावरणात पार पडला. शेवटी निलेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.


थोडे नवीन जरा जुने