अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील गौरवाडसह औरवाड,आलास,बुबनाळ, कवठेगुलंद,गणेशवाडी परिसरात ७७ वा प्रजासत्ताक दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह मोठ्या उत्साहात झाला.
गौरवाड ग्रामपंचायत पंटागणात सरपंच सौ.निलोफर इब्राहीम मोमीन यांच्या हस्ते झेंडावदंन करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत अधिकारी ए.आय.मुल्ला उपसरपंच सौ.कविता संजय माने यांच्यासह सर्व ग्रा.प.सदस्य,ग्रामस्थ मोठ्या संख्खेने उपस्थित होते.
गौरवाड उर्दु- मराठी शाळेच्या प्रांगणात उर्दु शाळेचे मुख्याध्यापक तौफीक मोमीन यांच्या हस्ते झेंडावदंन करण्यात आले.यावेळी उर्दु- मराठी शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी कवायत,देशभक्तीपर भाषण,गीत,समुहगीत,समुहनृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी मराठी शाळेचे मुख्याध्यापक विनोद माने ,सरपंच सौ.निलोफर मोमीन,उपसरपंच कविता माने,सर्व ग्रा.प.सदस्य,पोलीस पाटील सर्फराज कोल्हापुरे,तंटामुक्त अध्यक्ष,शालेय व्यवस्थापन समिती,ग्रामस्थ मोठ्या संख्खेंने उपस्थित होते.
कवठेगुलंद ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच सौ.संगिता नंदकुमार माने यांच्याहस्ते झेंडावदंन झाले.यावेळी ग्रामपंचायत अधिकारी अविनाश कांबळे यांच्यासह उपसरपंच,सर्व ग्रा.प.सदस्य,विविध मान्यवर,ग्रामस्थ मोठ्या संख्खेने उपस्थित होते.
बुबनाळ ग्रामपंचायत मध्ये ग्रा.प.सदस्य सौ.पुनम पुंडलिक कबाडे यांच्या हस्ते तर चावडी कट्ट्याजवळ उपसरपंच सौ.शरिफा मौला झांबरे यांच्या हस्ते झेंडावदंन झाले.यावेळी सर्व ग्रा.प.सदस्य,विविध मान्यवर,ग्रामस्थ मोठ्या संख्खेने उपस्थित होते.
आलास येथील कलाश्री बा.ग.पवार आलास - बुबनाळ प्रशालेत मुख्याध्यापक सुभाष सिद्धाप्पा कोळेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुवर्णा सुभाष कोळेकर यांच्या हस्ते ध्वजवदंन झाले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ, कुरुंदवाड संस्थेचे उपाध्यक्ष श्री. तातोबा भरमू शहापुरे , इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. निलोफर पठाण, जिमखाना विभाग प्रमुख ए. बी.येवारे, एस. डी. केंगाळे, आर. बी. मखमल्ला, व्ही. एन. पाटील, पी. एस. चाटे, एस. एस. पाटील, एस.बी. जोंग, के. जी. जोशी, एस. एस. गावडे, गोपाळ मोरे, दत्ता धुमाळे, सुधाकर शिंदे , विद्यार्थी उपस्थित होते.
५ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.चा ट्रूप कमांडर प्रसाद कोळी यांच्या नेतृत्वाखाली ध्वजास मानवंदना दिली व प्रशालेतील इतर विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली.
औरवाड ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच शफी पटेल यांच्या हस्ते ध्वजवदंन करण्यात आले.यावेळी उपसरपंच अफसर पटेल,सर्व ग्रा.प.सदस्य,विविध मान्यवर,ग्रामस्थ मोठ्या संख्खेने उपस्थित होते.
आलास ग्रामपंचायतमध्ये सफाई कामगार बंडु कोरे यांच्या हस्ते ध्वजवदंन करण्यात आले.यावेळी सरपंच चंद्रकांत दानोळे,उपसरपंच,सर्व ग्रा.प.सदस्य,विविध मान्यवर ,ग्रामस्थ मोठ्या संख्खेने उपस्थित होते.
गणेशवाडी ग्रामपंचायत कार्यालयात येथील नानासो परशराम सत्तेगिरी या युवकाची भारतीय सैन्यात निवड झाल्याबद्दल त्यांचे आई वडील श्री. परशराम सत्तेगिरी यांना ध्वजवदंनाचा मान देण्यात आला. यावेळी गणेशवाडीचे सरपंच प्रशांत अपिणे,उपसरपंच,सर्व ग्रा.प.सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते.
