Top News

श्री कृष्णावेणी उत्सवानिमित्त गणेशवाडीमध्ये आजपासुन विविध धार्मिक कार्यक्रम

अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :

गणेशवाडी (ता.शिरोळ ) येथे ग्रामपंचायत गणेशवाडी व श्री कृष्णा नदी यात्रा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री कृष्णावेणी उत्सवानिमित्त बुधवार दि.२८ जानेवारी ते २ फेब्रुवारी अखेर विविध धार्मिक कार्यक्रम,पालखी सोहळा,कीर्तन सेवा,ओटीभरण,हळदी-कुंकु,

महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आज बुधवारी बुधवार ता.२८ रोजी सांयकाळी सात वाजता श्री कृष्णावेणी देवीची मिरवणुक काढुन श्रीं ची षोडशोपचार पुजा व आरतीने श्रीं ची स्थापना करण्यात येणार आहे. 

  उत्सव कालावधीत नित्य सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत श्रीं ची षोडशोपचार पुजा,श्री सुक्त पठण,पुराणसेवा व महानैवेद्य होईल.दररोज सांयकाळी ४ वाजता किर्तन सेवा,रात्री ८ वाजता आरती व मंत्रपुष्प होईल.कीर्तनसेवा मध्ये ता.२९ रोजी ह.भ.प.श्री.गजानन विश्वनाथ काणेबुवा,ता.३० रोजी ह.भ.प.श्री.अमोघ श्रीधर काणेबुवा, सांयकाळी ६ वाजता हळदी-कुंकु समारंभ आहे.ता.३१ रोजी ह.भ.प.श्री.सुरेश दत्तात्रय काणेबुवा,ता.१ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.श्री.सुनिल दत्तात्रय काणेबुवा यांचे कीर्तन होईल.हे सर्व कार्यक्रम गावभाग,ब्राम्हणपुरीतील महादेव मंदिरमध्ये होतील.

सोमवार ता.२ रोजी उत्सवाचा मुख्य दिवस असुन यानिमित्त कृष्णा नदी घाटावर सकाळी पालखी मिरवणुक,दिवसभर ओटीभरणे कार्यक्रम,दुपारी महाप्रसाद,सांयकाळी ७ वाजता महाआरती होईल.रात्री १० वाजता ह.भ.प.श्री.संकेत भार्गव काणेबुवा यांच्या लळीताचे कीर्तनाने उत्सवाची सांगता होईल.सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकानी लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव समितीकडुन करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने