जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
जयसिंगपूर, संत निरंकारी मंडळ दिल्ली. सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने शनिवार दिनांक ६ जुलै रोजी सकाळी १० ते २ या वेळेत जयसिंगपूर येथे शिरोळ तालुका मराठा मंडळ जनतारा हायस्कूल जवळ सांगली कोल्हापूर रोड जयसिंगपूर या ठिकाणी विशाल संत निरंकारी महिला समागम होत आहे.
संत निरंकारी मंडळ गेली अनेक वर्षे जगामध्ये मानवतेच्या कल्याणासाठी संत समागम, बाल समागम , नारी समागमच्या माध्यमातून काम करत आहे याचाच एक भाग म्हणून जयसिंगपूर येथे जिल्हास्तरीय महिला संत समागम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्यातून २ हजार ते २ हजार ५०० महिला सहभाग घेणार आहे या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती आदरणीय बहन दिपू मखीजाजी डोंबिवली, मुंबईहून उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील संत निरंकारी मंडळाच्या सर्व शाखा, सेवादल व महिला भगिनी या कार्यक्रमात उपस्थित राहणार असून सत्संग समाप्तीनंतर सर्वांची लंगर, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आव्हान संत निरंकारी मंडळ कोल्हापूर झोन च्या वतीने करण्यात आले आहे.
