हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
रयत शिक्षण संस्थेचे, रमजानशेठ बाणदार विद्यालय,शिरढोण ता- शिरोळ जि- कोल्हापूर या विद्यालयातील चि अर्जुन प्रशांत पोतदार याची स्कॉलरशिप इ.5 वी 2023-24 शिष्यवृत्तीसाठी निवड होऊन वार्षिक 5000 रु शिष्यवृत्तीस पात्र ठरला तर 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2023-24 कु. सृष्टी सुनील गुरव हिने उत्तुंग यश मिळवून वार्षिक 7500 रु स्कॉलरशिपला पात्र ठरली तसेच NMMS परीक्षेतही विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
या विद्यार्थ्यांनी विद्यालयाची यशस्वी परंपरा अखंड कायम ठेवली ही विद्यालयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कर्तुत्ववान शिक्षकांच्या उत्कृष्ठ मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांनी मिळवले हे उत्तुंग यश मिळवले असुन मुख्याध्यापक,पर्यवेक्षक व शिक्षकांचे मनापासुन अभिनंदन असे गौरवोद्गार वैद्यकीय अधिकारी व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ कुमार पाटील यांनी काढले. ते गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणुन उद्योगपती पिरु बालीघाटे, स्कुल कमिटी सदस्य श्री सुनिल बोरगावे,सौ व श्री शेख, राजेंद्र खोत,रणजित पुजारी,बाबासो सोडगे,पिरु शेणवाडे,बापु गुरव इ उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री व्ही एम पाटील सर यांनी केले व विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी स्कुल कमिटी सदस्य स्व रूबाब शेख यांच्या कन्या सौ शेख यांनी विद्यार्थ्यांना गणवेश व शुध्द पेयजल शेड उभारणीसाठी देणगी जाहीर केली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ कुमार पाटील यांनी विद्यालयाच्या नुतनीकरनासाठी अविरतपणे प्रयत्नशील असलेल्या स्कुल कमिटी सदस्य श्री अविनाश पाटील, सुनिल बोरगावे, राजेंद्र खोत, रणजित पुजारी, अशोक मगदूम,देणगीदार ग्रामस्थांच्या सहकार्याचे कौतुक करुन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व आदर्श शिक्षक स्व एस आर फौंडेशनच्या वतीने विद्यालयास मदत करण्याचे अभिवचन दिले. आभार प्रदर्शन श्री चौगुले सर यांनी तर सूत्रसंचालन सौ गायकवाड मॅडम यांनी केले.
