Top News

काँग्रेस सरकारची जीवनदायी गृहलक्ष्मी योजनेचा निधी लवकरच लाभार्थींच्या खात्यावर जमा होईल : नाम. लक्ष्मी हेब्बाळकर



अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

   कर्नाटकातील सिदधरामय्या काँग्रेस सरकारची पाच ( गॅरंटी )जीवनदायी योजना ह्या पाच वर्षापर्यंत चालतील, भाजप नेते पाच हमी योजना बद्दल चूकीची माहिती जनते पर्यंत पोहचवत आहेत.. .दि.१ मे रोजी गृहलक्ष्मी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना निधी वर्ग करण्यात आला होता. आता जून महिन्याचा निधी लवकरच वर्ग केला जाणार असून आज किंवा उद्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल असे आश्वासन कर्नाटकच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यानी दिले.त्या आयोजीत पत्रकार परिषदेत सांगितले.              

पुढे बोलताना मंत्री म्हणाल्या की येत्या एक-दोन दिवसात गृहलक्ष्मी योजनेतील निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल, राज्य सरकारकडून जारी केलेल्या ५ गॅरंटी योजना कोणत्याही परिस्थितीत थांबविल्या जाणार नाहीत, राज्यात काँग्रेस सरकार ५ वर्षे सत्तेत असणार असून योजना बंद होईल अशी भीती कुणीही बाळगू नये. वचन दिल्याप्रमाणे प्रत्येकाला या योजनेचा लाभ करून दिला जाईल. कोणीही काहीही सांगितले तरी त्याकडे लक्ष देऊ नये. कोणत्याही परिस्थितीत योजना राबविली जाणार असल्याचे स्पष्टीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले आहे.                                         

थोडे नवीन जरा जुने