Top News

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात कौलव येथील मंत्रिकासह पांचजण पोलिसांच्या ताब्यात

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

धावपळीच्या युगात मेहनत शिवाय माणसाचे जीवन अशक्य आहे ,मात्र राधानगरी तालुक्यातील कौलव येथे रहात असलेले शरद धर्मा माने यांच्या घरात नरबळी अघोरी कृत्य चालू असल्याची माहिती मिळाली असता राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष गोरे हे आपल्या पोलिस अधिकारी सह घटना स्थळी जाऊन या प्रकरणी तेथे उपस्थित असलेल्या मांत्रिकासह पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांचे कडील असलेले साहित्य जप्त केले आहे.यात शरद धर्मा माने (वय.52 रा.कौलव )महेश सदाशिव काशिद (मांत्रिक वय 45 रा.राजमाचे ता.कराड) आशिष उमेश चव्हाण (वय 35 .रा.मंगळवार पेठ कराड) चंद्रकांत महादेव धुमाळ (वय 40.रा.मंगळवार पेठ कराड ) संतोष निवृत्ती लोहार (वय 42.रा.वाझोली ,पाटण) आणि कृष्णात बापू पाटील (वय 55.रा.पु.शिरोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

       घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की,कौलव येथे रहात असलेले शरद धर्मा माने यांना कराड येथील मांत्रिक महेश काशिद यांनी तुमच्या घरात गुप्त धन असून ते शोधून देतो असे सांगितल्याने बुधवार दि.03/07/2024 रोजी शरद माने यांच्या घरी येऊन त्यांच्या घरात येऊन देवघरात खड्डा खणण्याचे काम चालू होते आणि आजू बाजूला लिंबू व पूजेचे इतर साहित्य पडलेले दिसले याची माहिती कौलव गावात पसरली असता तेथील ग्रामपंचायतीने याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांनी राधानगरी पोलिस ठाण्याला माहिती दिली असता तात्काळ पोलिसांनी घटना स्थळी जाऊन मांत्रिकासह पाच जणांना अटक केली आहे. *. आज मोबाईलचा जमान्यात देखील असे भोंदूगिरी बाबांच्या नादात झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेक जण व्यस्त आहेत.त्यांनी सदर घटनेची नोंद घेऊन आपले आयुष्य सुधारावे असे जनतेतून बोलले जात आहे.या प्रकरणी अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशन करीत आहेत.                              

थोडे नवीन जरा जुने