Top News

शरद पॉलिटेक्ऩिकचा उच्चांकी निकाल ; विशेष प्राविण्यामध्ये १०७७ तर प्रथम श्रेणीत ५२० विद्यार्थी : २९ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण

यड्राव / शिवार न्यूज नेटवर्क :

      महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या २०२४ च्या उन्हाळी परिक्षेमध्ये यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्ऩिकने उच्चांकी यश मिळविले आहे. यामध्ये विशेष प्राविण्यसह १०७७ विद्यार्थी तर प्रथण श्रेणीत ५२० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच महाविद्यालयातील २९ विद्यार्थ्यांनी विविध विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून ‘शरद पॅटर्न’ने परत एक नवा उच्चांक निर्माण केला आहे.

महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विविध विभागातून आदित्य कुडचे (९५%), सेजल माने (९४.७८), सुजल नेमिष्टे (९४.५०), साक्षी साळवी(९४.३३), गौरव पाटील (९४.२५), श्रेया सिदनाळे, (९३.५६), प्रदिप मांगलेकर (९३), सृष्टी धोत्रे (९२.६७), सार्थक पुजारी (९२.५६) पार्थ बेले (९२.४७), अनुजा पोतदार (९२.३५), समिक्षा पाटील (९२.१३), निकिता पाटील (९२), सत्यम माळी (९१.८०), श्रेया कडाले (९१.६५), अथर्व कांबळे (९१.५३), पृथ्वीराज कोल्हापूरे (९१.१९), निकिता पाटील (९२), आयुष मोरे (९१.११) प्रतिक वठारे (९१) बीबीसारा बडवाले (९०.९४), आयुष सावंत (९०.८२), समृध्दी पवार (९०.६७) अदनान बागवान (९०.३५), श्रृती पाटील (९०.१३%) हे विद्यार्थी गुणवंत ठरले. 

द्वितीय वर्ष- तेजस्विनी दुधारकर, प्रज्ञा पाटील (९३.३३%) गणेश तटगुंटी (९३.०७), सृष्टी शिंगाडे (९१.२९), सानिका मगदूम (९१.०७), संस्कार रांगोळे (९०.७१), तेजस मगदूम (९०.५३), श्रतुजा माणगांवे (९०.४४), श्रुती गोधडे (९०.०४), शाहिन पटेल (९०) हे विद्यार्थी गुणवंत ठरले. 

प्रथम वर्ष- पूजा माळी (९२.३५%), स्नेहा पाटील (९१.६०), सार्थक बुचडे (९१.४१), नम्रता कचरे (९०.३५), श्रध्दा सुतार (९०.३५), रोहित माने (९०.२६), पूर्वा भेंडवडे (९०.१२) हे विद्यार्थी गुणवंत ठरले.  

बिग डेटा अॅनेलिटीक्स, नेटवर्क अॅण्ड इन्फॉरमेशन सिक्युरीटी, प्रोग्रॅम विथ पायथॉन, एमर्जिंग ट्रेंडस इन कॉम्प्युटर आयटी, प्रोग्रॅमिंग इन सी, डिजिटल इलेक्ट्रनिक्स अॅण्ड मायक्रोकंट्रोलर, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या विविध विषयात २९ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले. 

गुणवंत विद्यार्थ्यांचे संथेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्राचार्य बी. एस. ताशीलदार, सर्व डिन, विभाग प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले.

थोडे नवीन जरा जुने