हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
मार्शल योगा अकॅडमी संचलीत पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य आयोजित शिरोळ तालुकामधील कुमार विद्या मंदीर मराठी शाळा आलास येथील गरीब आणि गरजु विध्यार्थ्यांना वही आणि पेन वाटप करण्यात आले.
शिरोळ तालुका पोलीस मित्र संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे की, आपल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे, ज्यामुळे त्यांचे शिक्षण सुलभ होईल आणि त्यांच्या भविष्याच्या दिशेने त्यांना प्रोत्साहन मिळेल. शिक्षण हा आपल्या जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ते केवळ ज्ञानाचे दरवाजे उघडत नाही, तर आपल्याला एक चांगला नागरिक बनवण्यास मदत करते. शिक्षणामुळे आपल्याला नवीन संधी मिळतात, आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते, आणि समाजात एक आदर्श स्थान प्राप्त करण्याची प्रेरणा मिळते.
विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट शिक्षण घ्यावे, शिक्षणाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करावी, आपल्या गावाचे नाव उज्वल करावे, अशी शिरोळ तालुका पोलीस मित्र संघटनेच्या पदाधिकारी यांची इच्छा आहे.
या वह्या वाटप कार्यक्रमामुळे आपल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सुलभ होईल आणि त्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात मदत होईल.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. सुरेश राठोड, कोल्हापूरचे DYSP श्री. सदाशिव सदानंद, जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक श्री. सत्यवान हाके, शिरोळचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजीराव गायकवाड, महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री. संभाजी पाटील, कोल्हापूर जिल्हा प्रमुख श्री. दिलीप रणनवरे, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रविण बेडक्याळे, आलास गावाचे सरपंच श्री. सचिन दानोळे, फुले शाहू आंबेडकर विचारमंच फौंडेशनचे संचालक श्री. राजेंद्र कांबळे आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री. तुकाराम भास्कर या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम दिनांक ०१ जुलै २०२४ रोजी संपन्न झाला.
यावेळी पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य संघटनेसाठी कार्य करणारे श्री. संभाजी पाटील, फुले शाहू आंबेडकर विचारमंच फौंडेशनचे संचालक श्री. राजेंद्र कांबळे, आलास गावाचे सरपंच श्री. सचिन दानोळे आणि शिरोळ तालुका पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष श्री. मनोज कांबळे यांनी या कार्यक्रमावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालक यांना शिक्षणाबद्दल योग्य मार्गदर्शन केले.
यावेळी शिरोळ तालुका पोलीस मित्र संघटनेचे मनोज कांबळे, आनंदराव हणबर, अनिकेत पाटील, रुपाली देसाई, किर्ती कांबळे, हेमलता पाटील, शामराव देसाई, रोहीत चौगुले, उत्कर्ष तराळ, अरुण सुतार आणि संदीप सैसाले हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संपुर्ण सूत्रसंचालन शिरोळ तालुका पोलीस मित्र संघटनेच्या महीला अध्यक्ष सौ. रुपाली देसाई, कार्यक्रमाची प्रस्तावना शिरोळ तालुका पोलीस मित्र संघटनेचे सचिव श्री. अनिकेत पाटील आणि या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुणे, मान्यवर आणि पदाधिकारी याचे आभार प्रदर्शन शिरोळ तालुका पोलीस मित्र संघटनेच्या महीला आरोग्य अधिकारी सौ. हेमलता पाटील यांनी केले.
