Top News

बांबरवाडी दत्तवाडामध्ये वृक्षारोपण

इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क : 

     राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीचे औचित्य साधून विद्या मंदिर बांबरवाडी,दत्तवाड व अंगणवाडी क्रमांक २११ येथे ग्रामपंचायत दत्तवाडचे सरपंच चंद्रकांत कांबळे व सदस्यांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले.

         उपसरपंच अकबर काले, ग्रामपंचायत सदस्य बाबूराव पोवार,देवराज पाटील, डॉ.बसवराज पाटील,सामाजिक कार्यकर्ते बसगोंडा पाटील, अमित माने,प्रमोद पाटील, पांडुरंग चव्हाण यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी नामदेव चव्हाण,रमेश चव्हाण,रेखा चव्हाण उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे यांनी केले.तर आभार अध्यापक निलेश माने यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने