Top News

ग्रामविकास अधिकारी कांबळे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

 


हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :

     शिरढोण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी डी आर कांबळे हे आपल्या ३१ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.

     शिरढोण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी डी आर कांबळे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच बाबासाहेब हेरवाडे व उपसरपंच शक्ती पाटील यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.तसेच अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या वतीने ही सत्कार करण्यात आला. पोलीस पाटील अनुराधा जाधव,शहाबुद्दीन टाकवडे व तानाजी कोळी यांनी मनोगत व्यक्त केले.सरपंच बाबासाहेब हेरवाडे यांच्या हस्ते सेवा निवृत्ती निमित्त ग्रामविकास अधिकारी डी आर कांबळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

      यावेळी ग्रा प सदस्य रवी कांबळे, आरिफ मुजावर, सौ. शर्मिला टाकवडे, सौ.ललिता जाधव, सौ. मालन कुंभार,सौ. अनिता मोरडे, सौ.संगीता मगदूम, सौ. संगीता चौताळे, तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद कांबळे,डॉ. कोलप, अश्विन चव्हाण,सौ.दिपाली ढाले,श्रीमती.अलका मालगावे, जब्बार नालबंद , भास्कर चौगुले, सौ.सावित्री कोरे, सौ.कविता आंबी, अमर हेदू, संजय पवार, रवि मगदूम, निशिकांत जाधव आदी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने