Top News

लाडकी बहीण योजनेचे अर्ज करताना महिलांना कोणत्याही अडचणी येऊ देऊ नका

 आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रशासनाला सूचना 

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

महिलांच्या उन्नतीसाठी तसेच त्यांना आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना आणली असून या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना १५०० रुपये प्रति महिना प्रदान करण्यात येणार आहेत. तरी शिरोळ तालुक्यातील महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे. तसेच कागदपत्रांची पूर्तता आणि अर्ज करताना कोणत्याही महिलांना कोणत्याही अडचणी येऊ देऊ नका, अशा सूचनाही आमदार यड्रावकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' अंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. जुलै २०२४ पासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिली होती. त्यानुसार १ जुलैपासून ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरण्याचे काम शिरोळ तालुक्यात सुरू करण्यात आले आहे. यासाठी महिलांना तातडीने कागदपत्रे उपलब्ध व्हावीत आणि ऑनलाइन अर्ज तातडीने भरण्यात यावेत, यासाठी शिरोळ तालुका प्रशासनाला आमदार यड्रावकर यांनी आदेश दिले आहेत. दरम्यान, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सुद्धा घरोघरी जाऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यात येणार असून महिलांनी आवश्यक कागदपत्रे काढली असल्यास घरी बसून सुद्धा अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हा फॉर्म भरता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या योजनेच्या लाभासाठी खालील पात्रता हवी

लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची २१ वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २. ५० लाखापेक्षा जास्त नसावे.

या योजनेच्या लाभासाठी खालील कागदपत्रे आवश्यक

योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखल, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला,बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड, सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

अर्ज करण्याची प्रक्रिया अशी करावी

योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल ॲपद्वारे/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल : पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड) स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

अतिरिक्त पैशाची मागणी झाल्यास कारवाई

महाराष्ट्रातील महिलांना स्वावलंबी तसेच आर्थिक स्थैर प्राप्त व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजना अमलात आणली आहे. सदरच्या योजनेसाठी विनामूल्य प्रक्रिया महाराष्ट्र शासनाचे वतीने राबवण्यात येत असून यासाठी अर्ज भरताना तसेच कागदपत्रे काढताना शासकीय फी व्यतिरिक कोणी जादा पैशाची मागणी केली तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा, अशा सूचनाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

थोडे नवीन जरा जुने