अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
माहेरच्या जमिनीत हिस्सा ठेवल्याच्या रागातून झालेल्या सख्या भावांकडून विळ्याने वार करून चक्क सख्ख्या बहिणीच्या नवऱ्याला जीवे मारण्याची घटना जवळच्या जनवाड (ता चिक्कोडी) येथे शनिवार सकाळी सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समजते.
या हल्ल्यात सिध्दा पुजारी (48) याचा कान तुटून तो गंभीर जखमी झाला आहे. त्यास पुढील उपचारासाठी हुबळी येथील सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. या वादात सिद्धाचे मेहुणे शिवाप्पा निंगागोळ (40) व शंकर निंगागोळ(45) रा.हिरेकुडी हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळील चिक्कोडी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचेही समजते.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की,सिद्धा पुजारी हे जनवाड येथे शेती काम करतात.हिरेकुडी येथील लक्कव्वा निंगागोळ यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. लकव्वा यांचे वडील वारल्यानंतर लकव्वा यांनी आपल्या माहेरच्या जमिनीत आपल्याला हिस्सा हवा याबाबत कोर्टात दावा केला होता.त्यामुळे भाऊ बहिणी मध्ये वारंवार खटके उडत होते.या वादाचे परिणाम इतके विकोपाला पोहचले की, हिरेकुडीच्या भावांनी आज जनवाड येथील बहिणीच्या घरी जाऊन शिवाप्पा निंगागोड हा रागाच्या भरात आपल्या बहिणीचा नवऱ्याला म्हणजे सिध्दा पुजारी यास कानावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.यात सिध्दा डावा कान पूर्णतः तुटून खाली पडला.दरम्यान मदतीसाठी आरडाओरडा करत असताना पुन्हा शिवाप्पाने सिध्दास पाठलाग करून मारण्याचा प्रयत्न केला.दरम्यान त्याला वाचवण्यासाठी सिध्दा यांचा मुलगा म्हाळू आला असता.मेहवणा, मामा आणि भाच्याच्या झालेल्या झटापटीत शिवाप्पा निंगागोळ याला पाठीवर खुनी हल्ला होऊन व शंकर निंगागोळ यांच्या पोटावर विळ्याने वार होऊन दोघे भाऊही गंभीर जखमी झाल्याचे समजते.
घटनेदरम्यान पुजारी कुटुंबियांच्या आरडाओरड्याने घटना स्थळीआजूबाजूच्या नागरिकानी मोठ्या संख्येने धाव घेऊन पोलिसांना संपर्क केल्यास पोलिसांनी जखमींना खासगी वाहनासह तातडीने रुग्णवाहिकेच्या साहाय्याने चिक्कोडी बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.पुढे सिध्दा यांची प्रकृती चिंताजनक वाटल्याने त्यास हुबळी येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
