Top News

जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य करिअरची निवड आवश्यक : चंद्रकांत भाट



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

दहावीनंतर शिक्षणाच्या दृष्टीने आपल्या आयुष्यात महत्त्वाची दोन वर्ष येत असतात या काळात सकारात्मक ऊर्जा घेऊन आणि आत्मविश्वासाने अभ्यास करून आपली गुणवत्ता टिकवावी तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य करिअरची निवड करून वाटचाल करावी असे प्रतिपादन पत्रकार चंद्रकांत भाट यांनी केले.

येथील कन्या विद्या मंदिर नं 2 च्या माजी विद्यार्थिनींनी इयत्ता दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे अशा विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौ सुजाता पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होत्या शाळेचे मुख्याध्यापक नूर महम्मद मुल्ला यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला शाळेतील माजी विद्यार्थिनी व गुणवत्ता यादी स्थान मिळवलेल्या पूर्वा चावरे प्रणाली चावरे आदिती गुरव इफरा नालबंद सिद्धी बरगे यशश्री काळे शांभवी माळकर पायल काळे श्रावणी माळी यांचा शैक्षणिक साहित्य गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

या समारंभात मुख्याध्यापक नूर महम्मद मुल्ला श्री डकरे सर शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य अमर माने राजू काळे अभिजीत गुरव शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुजाता पाटील यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थ्यांना भविष्याच्या दृष्टीने कशी वाटचाल राहावी याबाबत मार्गदर्शन केले.

या समारंभास शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष धनंजय नाईक शिक्षक धनाजी आवळे सतीश नलवडे शिक्षिका वहिदा मुल्ला राजश्री टोणे दीपमाला कोळी प्रज्ञा माळकर यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

थोडे नवीन जरा जुने