Top News

प्राध्यापक श्रीहरी माने यांना आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर

 हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

सत्यशोधक सामाजिक फाउंडेशन, सर्च फाउंडेशन, युवा प्रबोधन साहित्यिक मंच पुणे यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार प्राध्यापक श्रीहरी माने यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे उद्या रविवारी सायंकाळी ५ वाजता रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे संपन्न होणार आहे.

 श्रीहरी माने यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान असून त्यांच्या शैक्षणिक संस्कारातून अनेक मुले उच्च पदावर कार्यरत आहेत. शिक्षणाक्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल सत्यशोधक सामाजिक फाउंडेशन, सर्च फाउंडेशन, युवा प्रबोधन साहित्यिक मंच पुणे यांच्यावतीने सन २०२४ चा आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे.

थोडे नवीन जरा जुने