Top News

शिरोळ शहरात पहिल्या टप्प्यात १०० झाडे लावण्याचा संकल्प

 पालिकेतील सार्वजनिक तरुण मंडळांच्या बैठकीत निर्णय 

 शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ शहरातील वाढते प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी वृक्ष संवर्धन ही काळाची गरज ओळखून शहरात एक मंडळ एक झाड हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात पालिकेत सार्वजनिक तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत प्राथमिक पहिल्या टप्प्यात शिरोळ शहरात 100 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

येथील सामाजिक कार्यकर्ते शक्तीजीत गुरव यांनी सोशल मीडियाद्वारे एक मंडळ एक झाड हा उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते त्या अनुषंगाने पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या अध्यक्षतेखाली तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी शहरातील जुना कुरुंदवाड रस्ता मौजे आगर रस्ता क्रांतिसिंह चौक विजयसिंह पाटील नगर घालवाड रस्ता अजिंक्यतारा मंडळ जय भवानी चौक बुवाफन महाराज मंदिर परिसर यासह अन्य ठिकाणी जागा उपलब्ध करून नगरपालिका आणि सार्वजनिक तरुण मंडळाच्या वतीने सुमारे 100 झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी सार्वजनिक तरुण मंडळांबरोबरच सामाजिक संस्थांनी घेतली आहे तसेच ऑक्सिजन पार्क उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरले झाडांना लागणारी माती खते पाणी याचे योग्य नियोजन करण्यात येणार आहे शिरोळ रोटरी क्लबने 25 झाडे व त्यांना लागणारे झाडांचे संरक्षक कवच देण्याचे जाहीर केले तर वृक्षारोपण करण्यासाठी लागणाऱ्या मदतीबरोबरच नगरपालिकेकडून झाडे आणि झाडांचे संरक्षण कवच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी दिले.

यावेळी शहर समन्वयक साहिल मकानदार सामाजिक कार्यकर्ते शक्तीजीत गुरव आनंदराव माने देशमुख आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे पत्रकार चंद्रकांत भाट डॉ सुरेश शेलार रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील बागडी चिंतामणी गोंदकर सामाजिक कार्यकर्ते विजय पट्टणशेट्टी प्रतीक धर्माधिकारी साजिद अत्तार निखिल मिणचे यांच्यासह विविध तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने