Top News

लोकशाहीचे जनक महात्मा बसवेश्वर -आनंद कर्णे

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव २०२४ व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प आनंद कर्णे (नांदेड) यांनी 'बसव प्रणित लोकशाही ते आजची लोकशाही एक चिंतन ' या विषयांवर गुंफले.त्याप्रसंगी प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांच्या मते लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली शासन यंत्रणा म्हणजे लोकशाही होय.

समतेच्या विचारावर विश्वास ठेवून लोकशाहीचा पाया घातला.महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात प्रथमतः लोकशाहीची मूल्ये रुजविली. स्त्रियांना शिक्षण व पूजेचा अधिकार दिला.प्रत्येकाला ईश्वरप्राप्तीचा मार्ग मिळविण्याचा अधिकार दिला. १२ व्या शतकात माणसाला सन्मान नसताना लोकशाहीची मूल्ये रुजविली.म्हणूनच खऱ्या अर्थाने लोकशाहीचे जनक महात्मा बसवेश्वर आहेत.

भारतीय लोकशाही समजून घेताना महात्मा बसवेश्वरांची लोकशाही समजून घेणे महत्वाचे आहे.हजारो वर्षापूर्वी देवमाणूस होताना सात तत्वे आत्मसात करण्याचे महात्मा बसवेश्वरांनी प्रथमतः सांगितले.

एखादया समस्येवर,उणिवेवर चिंतन करून,चर्चा करुन वचनांची निर्मिती केली. पात्रतेनुसार पदांवर निवड करण्यात येत होती.बसवेश्वरांचे वचन म्हणजेच कायदा १२ व्या शतकात अनुभव मंटपात निर्मिती केली.एखादया समस्येवर, उणिवेवर चिंतन करून,चर्चा करुन वचनांची निर्मिती केली.पात्रतेनुसार पदांवर निवड करण्यात येत होती.

महात्मा बसवेश्वर आपण समजून घेण्याची आज गरज आहे.लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येकांनी आपला मताचा अधिकार बजाविला पाहिजे.हा वापरला नाही तर चिंतनीय आहे.दरम्यान व्याख्यानमालेत श्रोता प्रोत्साहन बक्षीस योजना राबविली गेली.रोज महिला,पुरुष,युवती, १ली ते४थी, इ.५वी ते १०वी विद्यार्थी अशा गटांसाठी १५ बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

अध्यक्षस्थानी डॉ.अरविंद अशोकराव माने होते.यावेळी शिवाजीराव माने -देशमुख,माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,अमोल हिरेमठ,सचिन कोरोचीकर,अशोक कांबळे,विवेक चुडमुंगे,सुभाष आंबी,प्रविण आंबी,दिलीप शिरढोणे,ओंकार पाटील,संजय कांबळे,रमेशकुमार मिठारे,आप्पासो पाटील यांचेसह सांगली जिल्हा तसेच शिरोळ शहर व तालुक्यातील अनेक गावांतील शरण व शरणी उपस्थित होते. मारूती शाहू खडके व राजाराम महादेव खडके यांनी अन्नदासोह केले. स्वागत व प्रास्ताविक मनोजकुमार रणदिवे यांनी केले तर आभार महावीर कुंभार यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने