Top News

लिंगायत समाज संस्था शिरोळ च्या रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

समस्त लिंगायत समाज संस्था व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद मिळाला.युवक,युवती,महिला व पुरुष यांचा सहभाग होता.विशेषत: श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्टच्या आरोग्य केंद्राचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते डॉ.कुमार पाटील यांनी ही रक्तदान केले.

        श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, सहकारमहर्षि गणपतराव पाटील,माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,युवा नेते पृथ्वीराज यादव यांचे हस्ते रक्तदात्यांना स्टीलची पाण्याची बॉटल व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.  याप्रसंगी संजीव आण्णा पुजारी,डॉ.राहूल खोत,डॉ. शेखर पाटील,डॉ.अतुल पाटील, डॉ.अभिजीत फल्ले,डॉ.महेश बन्ने,डॉ.सतिश कुंभार,डॉ. दिपक कोठगिरे,रमेश फल्ले, संतोष कारदगे,संतोष चिक्कोडे, सौरभ खडके,मिलींद कोरे, धनंजय फल्ले, डॉ.प्रमोद हेगडे, खंडेराव हेरवाडे,गुरुनाथ भुशिंगे,डॉ.शिवाजी पाटील,डॉ. बाळासाहेब देवताळे,दिलीप शिरढोणे,मनोजकुमार रणदिवे यांचेसह शरण- शरणी उपस्थित होते.रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती शिरोळ चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

थोडे नवीन जरा जुने