Top News

जयसिंगपूर इनरव्हील क्लबने शांतीसागर शाळेचे रूपडे पालटले

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी मोठी गुणवत्ता आहे त्यांचे भविष्य घडवण्यासाठी शाळेला लागणाऱ्या भौतिक सुविधाच्या पूर्ततेसाठी इनरव्हील क्लब नेहमीच कटिबद्ध राहील.असे आश्वासन इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन वैशाली लोखंडे यांनी दिले. 

शिरटी (ता शिरोळ) येथील शांतीसागर विद्यामंदिर या शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी जयसिंगपूर इनरव्हील क्लबने सहकार्य केले. त्यांच्या माध्यमातून शाळेची दुरुस्ती करून रंगरंगोटी करण्यात आली.तसेच शौचालयाची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात आली.शाळेस पुस्तक ठेवण्याचे रॅक,स्वच्छतागृहासाठी पाण्याची टाकी,विद्यार्थ्यांना लागणारे खेळाचे साहित्य अशा सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेच्या वतीने इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी वैशाली लोखंडे ह्या बोलत होत्या. 

शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.यावेळी माजी सरपंच राहुल सूर्यवंशी यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन इनरव्हील क्लबच्या वतीने सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.ऋणानुबंध व समृध्दी स्पर्धा परीक्षेत जिल्हयात प्रथम आलेबद्दल कु.आरव अनिल म्हाळुंगेकर इयत्ता दुसरी याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते जीवनधर चौगुले यांनी स्वखर्चाने शिरटी गावातील सर्व अंगणवाड्यांना खुर्ची देण्याचे जाहीर केले तर इनरव्हील क्लबने या शाळेतील गुणवंत विद्यार्थी याचा शैक्षणिक खर्च देण्याचे घोषित केले.

या समारंभास इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट डायरेक्टर सौ.वसुंधरा कोल्हे जयसिंगपूर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा शिल्पा आडदांडे,सदस्या नीलम बिरनाळे,पल्लवी पाटील,भारती चौगुले,अश्विनी पाटील,प्रियंका पाटील,सरपंच मुल्लाणी व सदस्य,स्वाभिमानीचे युवा नेते सौरभ शेट्टी,शिरटीचे सामाजिक कार्यकर्ते अलमनीसार मुल्लाणी, राजकुमार शिरगांवे,जीवनधर चौगुले,रामचंद्र कोगनोळे,बापू चौगुले,बाळासो गवळी,वसंत मगदूम,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत रामोशी, दीपक हुपरे यांच्यासह शिक्षक,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने