हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांच्या दूरदृष्टीने शिरोळ तालुका व कर्नाटक सीमाभागातील सर्वसामान्य नागरिकांना व सभासदांनाच्या सोयीसाठी सुरु केलेल्या व विद्यमान चेअरमन, क्षारपड मुक्तीचे जनक उद्यानपंडित श्री गणपतराव पाटील दादांच्या पारदर्शक नेतृत्वाखाली गेली 30 वर्षे वैद्यकीय सेवा देत असलेल्या तसेच कार्यकारी संचालक श्री एम व्ही पाटील, आरोग्य व शिक्षण संचालक श्री अंबाप्रसाद नानिवडेकर यांच्या उत्कृष्ट संयोजनाखाली सुरु असलेल्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्र दत्तनगर शिरोळ येथे जागतिक परिचारिका दिन (इंटरनॅशनल नर्सेस डे) निमित्त आद्यपरिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल व भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला. यावेळी सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ कुमार पाटील यांनी परिचारिकांना लेखणी व चॉकलेट भेट देऊन परिचारक दिनाचा इतिहास फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचे कर्तृत्व विशद करून सर्वांना परिचारक दिनाच्या व जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या.पुढे बोलताना डॉ कुमार पाटील म्हणाले परिचारिका नर्सेस यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान खुप मोठे आहे. दया मानवता समानता या तत्वावर कार्यरत असणाऱ्या परीचारिकांचा योग्य तो मानसन्मान राखला पाहीजे.मातृत्व आणि कर्तृत्वाचा अविरत झरा म्हणजे परिचारिका होत असेही शेवटी डॉ कुमार पाटील म्हणाले. जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून सामाजिक व अनिस चे पुर्णवेळ कार्यकर्ते श्री खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे व त्यांचे सहकारीसामाजिक कार्यकर्ते श्री सचेतन बनसोडे यांनी श्री दत्त आरोग्य केंद्र शिरोळ येथील परिचारिकांना लेखणी भेट देऊन परिचारिका दिनाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. या उपक्रम ते गेली अनेक वर्षे अविरतपणे राबवत आहेत. यावेळी ऑफिसर सुप्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉ. प्रिया खाडे मॅडम यांच्यासह इनचार्ज सिस्टर भाग्यश्री भोसले, परिचारिका शैलजा गवळी, वैशाली कुरणे, नम्रता जगताप, अनुजा लोंढे, सुप्रिया माने, अनिता कमलाकर, अरविंद वासकर, किशोर कांबळे, क्लार्क चंद्रकांत तावदरे, क्ष किरण तंत्रज्ञ किरण भोसले, फार्मासिस्ट माधुरी कांबळे, अलमास कलावंत, सविता बाबर मावशी, राणी पवार मावशी, अंबुलन्स ड्राइवर सिकंदर सुतार, कारखाना जेष्ठ कर्मचारी रवींद्र पाटील चंदूर, रुग्ण व नातेवाईक यांच्यासह इतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
