Top News

बोरगाव येथे १९ मे रोजी ज्योतिर्लिंग देवाची भव्य यात्रा

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

 बोरगाव येथील भाविकांचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान व सीमा भागातील एक जागृत देवस्थान म्हणून नावारूपास आलेले बोरगाव तालुका निपाणी येथील ज्योतिर्लिंग देवाची भव्य अन दिव्य अशी यात्रा व महाप्रसाद भंडारखाना चा कार्यक्रम येत्या रविवारी दिनांक १९ मे रोजी बोरगाव येथे संपन्न होणार असल्याची माहिती यात्रा कमिटी यांनी केले आहेत.         

     गेल्या ६९ वर्षापासून कैलासवासी परमपूज शांत महाराज यांनी कर्नाटक महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग भक्तांना  बोरगाव ची ओळख व देवाची महिमा यात्रेच्या माध्यमातून  करून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत,श्रद्धा ,प्रामाणिकपणा व जागृत ही बोरगाव येथील ज्योतिर्लिंग देवाची खास महिमा आहे आणि हे जपण्याचे कार्य आज शांतानंद प्रसाद महाराज  करीत आहेत.                           *.     शनिवार दिनांक १८ मे रोजी यात्रेला सुरुवात होत असून  या दिवशी सकाळी श्री ज्योतिर्लिंग मंदिरातील ज्योतिर्लिंग देवास व श्री यमाई देवीस ,श्री काळभैरवनाथ व श्री पशुपतिनाथा  सह मंदिरातील बारा ज्योतिर्लिंग आणि परमपूज्य शांत महाराजांची मूर्ती व समाधीस भक्तगणाकडून महाअभिषेक कऱण्यात येणार आहे. सायंकाळी 5  वाजता ज्योतिर्लिंग देवाची व परमपूज शांत महाराज यांच्या पालखी साठी बैठक होणार आहे                                               रविवारी १९ मे रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी सकाळी शांतानंद प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीत श्री ज्योतिर्लिंग देवाची व परमपूज शांत महाराजांच्या पालखी व रथयात्रेला सुरवात होणार आहे. यावेळी बोरगांव येथील मान्यवर व श्री गजानन महाराज गुरुजी शिवप्रतिष्ठान इचलकरंजी व हरिभक्त पंत श्री संतोष कोळी उर्फ बाळ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी व रथ यात्रेला सुरुवात होणार आहे. या रथयात्रेत बोरगांव सह कर्नाटक व महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग भक्त मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत .      

    या मिरवणुकीत दोन महान हाती, बारा घोडे, दोन ब्रास बँड कंपनी, भजनी मंडळ सह सीमा भागातील हजारोंच्या संख्येने भक्त मंडळींचा सहभाग लाभणार आहे.  सर्व भक्तासाठी १९ मे रोजी सकाळी ११ ते रात्री ८  वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यात्रा कमिटीचे मुख्य व्यवस्थापक श्री राजू दादा ऊरूणकर ,बाळासाहेब ऊरूणकर, राजू नरवाडे, सुभाष नरवाडे सह गावातील  युवक मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभणार असून या यात्रेसाठी भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी कडून करण्यात येत आहे.

थोडे नवीन जरा जुने