Top News

सदलग्यात छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भव्य दिव्य स्वरूपात आगमन सोहळ्याचे आयोजन

बोरगांव/ सदलगा / प्रतिनिधी

सदलगा येथील बस स्थानकाशेजारी बहुप्रतिक्षित छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे भव्यदिव्य स्वरूपात आगमनाची तयारी समस्त शिवप्रेमींच्या कडून तसेच छ. शिवाजी महाराज पुतळा समितीच्या युवकांकडून सुरू झाली आहे. शिवजयंतीच्यापूर्वी छ. शिवाजी महाराज चौकात चबुतऱ्याजवळ हा नविन अश्वारूढ पुतळा आणण्यात येणार असून मुहूर्त पाहून विधीपूर्वक चबुतऱ्यावर बसविण्यात येणार असल्याची माहिती समस्त शिवप्रेमी प्रमुखांनी आज दिली.

कोल्हापूर मधील मूर्तीकार संदिप पाटील यांनी तयार केलेल्या छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मिरवणुकीने कोगनोळी, निपाणी, पट्टणकुडी, नवन्याळ, चिकोडी, हिरेकुडी,एक्संबा, मलिकवाड मार्गे सदलग्यातील नियोजित जागेवर आणण्यात येणार आहे.

लोकप्रिय आमदार गणेश हुक्केरी यांनी अन्नपूर्णेश्वरी फौंडेशनकडून पंचवीस लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला. बाळासाहेब पाटील यांनी सविस्तर माहिती देताना म्हणाले, कोगनोळी मधील दलित आणि मुस्लिम समाजांनी स्वागत व अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे. सौंदलगा , यमगर्णी मध्येही शिवपुतळ्याचे स्वागत करण्यात येणार आहे निपाणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे स्वागत आणि भव्य दिव्य आतषबाजी , बेंजो पथक , मुलींचे लेझीम पथक व डाँल्बी सह मिरवणूक काढणेत येणार आहे. चार तासांचा कार्यक्रम होऊन नवन्याळ ता चिकोडी मध्ये पहिला मुक्काम आहे. तिथुनच चिंचणी वासियांकडून स्वागतसमारंभ स्वीकारत  चिकोडी मध्ये भव्य मिरवणूकीने स्वागत होणार आहे. पुढे  हिरेकुडी मार्गे एक्संबा. तील चन्नम्मा सर्कल मध्ये स्वागत समारंभ होऊन मलिकवाड मध्ये १० तारखेला मुक्काम आहे.११ तारखेला मलिकवाड मधील बैलगाडी शर्यत मैदान संपल्यानंतर सदलगा कडे प्रयाण करत महावीर सर्कलमधून सदलग्यात पंचधातूच्या शिवपुतळ्याची संपूर्ण शहरातून भव्यदिव्य स्वरूपात मिरवणूक काढून चबुतऱ्याजवळ आणण्यात येणार आहे. १४.५ फूट उंचीचा छ. शिवाजी महाराजांचा हा पुतळा बेळगांव जिल्ह्यातील उंच पुतळा ठरणार आहे. या मिरवणुकीतील सर्व सहभाग्यांना सदलग्यातील मुस्लिम समाजाकडून दर्गा चौक, गांधी चौक मध्ये समस्त मुस्लिम समाजाकडून नाष्टा व्यवस्था करण्यात येणार आहेत अशी माहिती अझरुद्दीन शेखजी आणि अल्ताफ जमादार यांनी दिली. 

सदलगा आणि परिसरातील सर्व धर्मातील, सर्व समाजातील सर्वसामान्यांपासून प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्वागत समारंभात सहभागी व्हावे असे समितीकडून आवाहन केले आहे. शहरातील सर्व संघ संस्था, शाळा महाविद्यालये, सरकारी निमसरकारी , खाजगी कार्यालये यांना लेखी पत्राद्वारे सहभागी होण्यासाठी आवाहनात्म पत्रे देण्यात येणार आहेत.

शिवपुतळा समिती अध्यक्ष दर्शन जगताप, मोहनराव शितोळे, बाळासाहेब पाटील, संभाजी पाटील, रमेश माने, अनिरुद्ध पाटील, कुमार माने, प्रकाश पाटील, अशोक जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत ही माहिती देण्यात आली. यावेळी सर्व बांधवांचे स्वागत व प्रस्तावना आण्णासाहेब कदम यांनी केले. आभार बाळासाहेब यादव यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने