Top News

रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम हे उदगांव येथील असलेल्या बायपास मार्गावरुन करू : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

दानोळी, कोथळी, उमळवाड या परीसरातील शेतकर्‍यांच्या अडचणी दुर करण्यासाठी होणारा रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम हे उदगांव येथील असलेल्या बायपास मार्गावरुन करू. त्याचबरोबर सातारा-कागल मार्गातील शिरोली, संभापूर, किणी, घुणकी, कणेगांव, येलूर कामेरी, वाघवाडी, कासेगांव यातील उड्डाण पुले, अंडरपास व पुलांची मागणी असलेल्या त्रुटी पुर्ण करून तात्काळ करण्यात येतील. असे अश्वासन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी खासदार धैर्यशील माने यांना दिले.

दरम्यान, मंत्री गडकरी यांनी लगेच प्राधिकरण विभागाच्या अधिकार्‍यांना याबाबतच्या सुचना फोनवरून देवून तात्काळ बदल प्रस्ताव करण्याचे आदेश दिले. याबाबातचे निवेदनही खासदार माने यांनी मंत्री गडकरी यांना दिले.

खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी मंत्री गडकरी यांनी प्राधिकरण विभागाच्या अधिकार्‍यांना सुचना दिल्या. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी होणार्‍या रत्नागिरी महामार्गातील उदगांव येथे नवीन शेती हस्तांतर करुन महामार्ग झाल्यास उदगांव येथील शेतकर्‍यांची तिसर्‍यांदा शेती हस्तांतर होणार आहेत. याच ठिकाणी 30 फुट उंचीचा भराव होणार असल्याने दानोळी, उमळवाड, कोथळी परीसरातील गावाना महापुराचा आणखीन मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे सध्या उदगांव येथे असलेल्या बायपास मार्गावरूनच नवीन मार्ग करावा.

त्याचबरोबर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदीचे महापुराचे पाणी पास होण्यासाठी पंचगंगा नदी पूल ते शिरोली येथे पिलर चा रस्ता करणे शिरोली येथे महामार्ग ओलांडणेसाठी अंडरपास करणे, संभापूर व किणी येथे अंडरपास व बोगदा किंवा पुल करणे, घुणकी येथे दोन्ही बाजुला सेवा रस्ते करणे तसेच वारणा नदीचे पुराचे पाणी पास होण्यासाठी पिलरचा रास्ता करणे किंवा पाच ते सहा अंडरपास बोगदे करणे, येलूर येथे अंडरपास करणे, वाघवाडी फाटा येथे आर.सी.सी गटर्स बांधणे, कासेगांव येथे मोठा उड्डाणपुल करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 वरती मौजे वडगाव हेरले माले अतिग्रे येथे अंडरपास करणे गरजेचे असल्याचे सांगितले 

सर्व माहिती मंत्री गडकरी यांनी समजवून घेतली. त्यानंतर त्यांनी संबधित विभागाचे अधिकारी यांना संपर्क करून शेतकर्‍यांच्या व नागरीकांच्या अडचणी समजवून घेवून असलेल्या त्रुटी पुर्ण करुन मार्ग करावा. शिवाय उदगांव येथे तिसर्‍यांदा जमीन हस्तांतर होणार आहे. व दुसर्‍या गावांना महापुराचा फटका बसणार असल्याने जुन्या असलेल्या बायपास मार्गावरून मार्ग करण्याच्या सुचना दिल्या. यावर अधिकर्‍यांनी तात्काळ उदगांव येथे तात्काळ फेर सर्व्हे करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

थोडे नवीन जरा जुने