अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
सीमाभागातील औद्योगिक क्षेत्र म्हणून प्रचलित असलेल्या बोरगाव येथील जैन समाजाचे अशाकिरण बनलेले व येथील महावीर सर्कल परिसरात गेल्या काही महिन्यांपासून उभारण्यात येत असलेला कीर्ती स्तंभ उभारणी बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमी लवकरच या कीर्ती स्तंभाचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार असल्याची माहिती हालशुगर निपाणी संचालक व नगरसेवक शरदराव जंगटे यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून बोरगाव वासियांचे स्वप्न बनलेल्या या कीर्ती स्तंभ उभारणीला आचार्य श्री 108 कुलरत्न भूषण मुनी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली व आम शशिकला जोल्ले व खास अण्णासाहेब जोल्ले या दांपत्यांच्या विचार विनिमयातून खऱ्या अर्थाने ह्या कीर्ती स्थंभ निर्मितीला चालना मिळाली आहे.शिवाय संपूर्ण बोरगाव शहरवासीयांच्या लोकवर्गणीतून बांधण्यात येत असलेल्या या भव्य दिव्य किर्तीस्तंभ उभारणीचे काम सद्या अंतिम टप्प्यात आले असून 20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी पर्यंत जैन मुनी महाराजांच्या दिव्य सानिध्यात विविध धार्मिक कार्यक्रमाने याचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार असल्याचेही नगरसेवक शरदराव जंगटे यांनी सांगितले.
दिगंबर जैन समाजाचा आदर्श,अहिंसा परमोधर्माची शिकवण आणि जगा आणि जगू द्या ही प्रेरणा देणारा हा कीर्ती स्तंभ जवळपास 41 फूट उंचीचा उभारण्यात आलेला आहे.त्यामुळे हा कीर्ती स्तंभ संपूर्ण जिल्ह्यात ऐतिहासिक कीर्ती स्तंभ म्हणून ओळखला जाणार आहे.अंदाजे जवळपास 27 लाखाच्या आसपास खर्चाने उभारण्यात आलेला या किर्तीस्तंभाचे फाऊंडेशन उत्तम प्रतीच्या महागड्या काळ्या दगडी बांधकामाने तर उर्वरित 36 फूट हे इटालीयन मार्बल दगडाने घडवण्यात आलेले आहे.त्यामुळे हा किर्ती स्तंभ जैन समाजा बरोबर बोरगाव शहराचे हि सौंदर्य वाढवणारा ठरणारा दिसत आहे.अशा या कीर्तीस्तंभ उभारणीचे कामकाज जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर अंतिम टप्प्यात आले असून लवकरच याचा मोठया थाटात लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे.
आयोजित पत्रकार बैठकीत जितेंद्र पाटील(भोजे),अजित तेरदाळे,जितु आम्मनावर,राजू लठलठे,महावीर पाटील, शांतू पत्रावळे,सुनिल गोरवाडे,रावसाहेब चोकावे- पाटील,धवल भिवरे,राजू कुंभार, बाहुबली पाटील,भरत पाटील,नितीन पाटील, विष्णू तोडकर,देव माळी,फिरोज आफराज यांच्यासह अन्य कार्यकर्ते,समाज बांधव उपस्थित होते.
