अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना पवित्र असा संविधान रूपी ग्रंथ दिलेला आहे.आज देश ज्या संविधानानुसार राज्य कारभार करीत आहे.त्या संविधानाची प्रत्येक नागरिकांपर्यंत जनजागृती व्हावी या उद्देशाने कर्नाटक राज्य सरकार मार्फत राज्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये संविधान जनजागृती रथ यात्रेचे आयोजन केले आहे.त्याच पार्श्वभूमीवर या संविधान रथयात्रेचे ढोणेवाडी ता निपाणी येथे गुरूवार दि 8 रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास बसस्थानक परिसरात येथे आगमन झाले.दरम्यान ग्राम पंचायत अध्यक्षा सौ गीतांजली विजय माने यांच्यासह अन्य ग्राम पंचायत सदस्यांच्या मार्फत रथ यात्रेतील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले.
समस्त ग्रामस्थ,शालेय विद्यार्थी, दलीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहभागाने व ग्राम पंचायतीच्या पुढाकाराने वाजत गाजत गावातील प्रमुख मार्गाने निघालेल्या या संविधान जनजागृती रथ यात्रेत अंगणवाडी कर्मचारी सेविकांनी डोक्यावर कळस घेवून सहभाग घेतला होता.
या संविधान जनजागृती रथ यात्रेत येथील कन्नड,मराठी,प्राथमिक,माध्यमिक शाळेचे विध्यार्थ्यानी सहभाग दाखवून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.दरम्यान भारतीय राज्यघटनेचे प्रतिज्ञा वाचन करून उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्षा सौ गीतांजली माने,उपाध्यक्षा सौ नंदिनी कांबळे, सदस्य सौ संपदा जाधव, बाबासाहेब खोत,दादासो सुतार,शिवाजी नागराळे,सौ.कस्तुरी दुगाने,सौ तायवा बारवाडे,ग्राम विकास अधिकारी सुरज इंगळे,तानाजी जाधव,विजय माने,खानु दुगाने,दिलिप कांबळे,सेक्रेटरी रवी चौगुले, बबन सुतार,संजय बुडके,सर्व शाळा मुख्याध्यापक,शिक्षक,युवक मंडळांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
