Top News

निपाणी व चिकोडी तालुक्यातील सर्व मराठा समाज बांधवांचा सहविचार मेळावा संपन्न

 


अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क :

चिकोडी तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन येथे नुकताच निपाणी व चिकोडी तालुक्यातील सर्व मराठा समाज बांधवांचा सहविचार मेळावा मराठा महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय एडवोकेट बी.आर. यादव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

सदर मेळाव्यामध्ये मराठा समाजाचा इतिहास, वर्तमानकाळ व भविष्यकाळ आणि चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रस्थापित करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या नियोजित कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये शिवरायांच्या पुतळ्याची मिरवणूक आणि उद्घाटन याप्रमाणे दोन विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये प्रा. शिवाजी माने, माजी जिल्हा परिषद सदस्या सुमित्रा उगळे, प्राध्यापक प्रकाश कदम, आर. जी. डोमणे, चिकोडी तालुका ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष अनिल पाटील, अजय सूर्यवंशी मराठा महासंघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी बाळासाहेब पाटील, अनिल माने, राम माने, सदलगा शहरातील कार्यकर्ते अण्णासाहेब कदम, यादव इत्यादी वक्त्यांची पुढील नियोजित कार्यक्रमावर सविस्तर भाषणे व नंतर चर्चा करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी निपाणी व चिकोडी तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाज मंडळाचे सर्व पदाधिकारी व उत्साही कार्यकर्ते तसेच चिकोडी येथील मराठा सेवा संघ होस्पेट गल्ली येथील मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते संजू शिंदे, प्रकाश घोरपडे, शंकर चव्हाण, विजय जाधव ,किरण घाडगे, महादेव भोपळे, नारायण लकडे,अमित नेजकर, पिंटू यादव, कुणाल शिंदे, यशवंत यादव, गजू पवार, अनिल शिंदे, अरुण लकडे, सागर भोसले, प्रदीप जोंधळे इत्यादी मराठा समाजाचेअनेक उत्साही तरुण कार्यकर्ते आणि मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुढील कार्यक्रमासाठी श्री अनिल माने विद्यमान सदस्य चिकोडी नगरपंचायत चिकोडी यांनी मराठा सेवा संघ होस्पेट गल्ली चिकोडी यांच्याकडून एक लाख रुपये देणगी सदलगा शहरातील नियोजित कार्यक्रमासाठी दिली .त्यांचे सदलगा शहरवासीयांच्या वतीने अभिनंदन व आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला.

थोडे नवीन जरा जुने