हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
उच्च न्यायालयाने गायरानातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले दिल्याने जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेत कारवाईची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे हेरवाड गावामध्ये सुमारे ४५० अतिक्रमणधारकांचा यामध्ये समावेश असून त्यांची यादी बनविण्याचे काम सुरु असून सदरची यादी तालुका प्रशासनाकडे देण्यात येणार असल्याचे समजते.
गावाच्या काळानुसार लोकसंख्येचा प्रमाण वाढले तरी गावठाण हद्दवाढ करण्याची कार्यवाही प्रशासनाने वेळीत केली नाही. गावामध्ये घरे बांधणेसाठी जागा नसल्याने सामान्य माणसांनी आयुष्याची पुंजी साठवून गायरानातील मोकळ्या जागेवर छोटे घरे बांधून संसार करणेचा प्रयत्न केला आहे. गावठाण हद्दवाढ मागणी करुन अनेक प्रस्ताव शासन दरबारी धुळखात पडले आहेत. त्यामुळे गायरान अतिक्रमण वाढल्याचे दुर्देवी चित्र आहे.
आज बैठकीचे आयोजन
उच्च न्यायालयाने गायरानातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले दिल्याने याची धास्ती अतिक्रमण धारकांनी घेतली आहे. दरम्यान या पार्श्वभूमिवर हेरवाड माळभाग येथील तिरंगा चौकात आज रात्री 8 वाजता अतिक्रमण धारकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सर्व अतिक्रमण धारकांनी उपस्थितीत दर्शवावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव यांनी केले आहे.
