शिरोळचे अजिंक्यतारा मंडळ... चांगुलपणाची विचारधारा....
शिरोळ गावचा उत्सव व उरूस हा आनंददायी पर्वणी सोहळा 14 नोव्हेंबर पासून साजरा होत आहे , या ऐतिहासिक नगरीत ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशहाचा उरूस म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्य तसेच समता - ममतेचा जागर करणारा असतो,,,,,,, उरूस सोहळ्याची परंपरा आजही मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते , यावेळी प्रत्येकाच्या मनात सेवाभाव व भक्तिभाव निर्माण झालेला असतो, शिरोळ शहरवासीय, विविध संस्था तरुण मंडळे यांचे याकामी मोलाचे योगदान असते, दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ऐच्छिक देणगी अथवा वर्गणी घेऊनच हा उरूस साजरा करण्याची परंपरा आहे, शिरोळ उरूस नियोजनात नगरपरिषदेचा पुढाकार असतो, पण,,,, उरूस साजरा करण्याची जबाबदारी व बहुमान गावातील एका सार्वजनिक मंडळाला चिट्टी सोडतीद्वारे दिला जातो,,,,,,,,,
शिरोळ येथे सामाजिक बांधिलकी जपणारे व सामान्य माणसासाठी लोकाभिमुख कार्य करणारे अजिंक्यतारा मंडळाला यावर्षीचा उरूस संयोजनचा मान मिळाला आहे, त्यामुळे रसिक मनाची आवड व लोक प्रबोधनाच्या दिंडीची कावड,,,, अशी दुहेरी पालखी वाहण्याची जबाबदारी अजिंक्यतारा मंडळाच्या उरूस समितीवर आली आहे, उरुसानिमित्त खेळ, कला ,प्रबोधन , रंजन या आनंददायी कार्यक्रमाचे आयोजन अजिंक्यतारा मंडळाच्या उरूस समितीने केले आहे , दिवसभराच्या स्पर्धेबरोबरच मनोरंजनाचा खजिना असणाऱ्या कार्यक्रमाला रंग भरणार आहे.
अजिंक्यतारा मंडळाचे धनाजी पाटील नरदेकर हे कप्तान आहेत तर तुषार पाटील यांच्याकडे शिरोळ उरूस समितीचे अध्यक्ष आहेत, यावर्षी प्रथमच सात दिवस उत्सव व उरुस साजरा होत आहे,या धार्मिक सोहळ्यात आनंद ,उत्साह याबरोबरच,,,शिस्त,,, आपलेपणा,,,,भक्तिभाव ही वैशिष्ट्ये जोपासून हा उरूस साजरा करण्याबाबत सहकार्य करावे असे गावातील अन्य मंडळाच्या कार्यकर्त्यांना उरूस समितीने विनंती केली आहे.
विशेष म्हणजे या अजिंक्यतारा मंडळ कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव सोहळ्यातून लोकप्रबोधन कार्यक्रमातून समाजमन जोडले आहे , तसेच दहीहंडी उपक्रमातून साहस आणि एकता त्यांनी जपली असून वर्षभर सामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभाग घेत गाव माझं भारी,,,! अशी संकल्पना कायम जपली आहे,शिरोळवासीय एकजूटीने, आनंदाने , गुण्या- गोविंदाने, सुखा-समाधानाने उरूस साजरा करतात, कितीही दूर अंतरावर गावकरी असले तरी गाव पंढरी ओढीने उरुसाच्या निमित्ताने गावात येतात , माझ्या मनातलं व गावातलं आदर्श,,,,, अजिंक्यतारा मंडळ उरुस समितीला हार्दिक शुभेच्छा !
उरुसानिमित्त शिरोळ ऐतिहासिक नगरीत येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत,,!
- दगडू माने पत्रकार, शिरोळ
