Top News

कोगनोळीची भिमकन्या डॉ. रोहिणी ढोबळे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

        कोगनोळी ता.निपाणी येथील रहिवासी आणि सौंदलगा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक धनंजय ढोबळे आणि माजी ता.पंचायत सदस्या शारदा ढोबळे यांची कन्या कु.रोहिणी धनंजय ढोबळे यांना नुकतीच मानांकन अशी डॉक्टरेट पदवी प्रधान करण्यात आली आहे.रोहिणीने डी फार्म अर्थातच “डॉक्टर ऑफ फार्मसी” ( डॉक्टरेट) या पदवीचे सहा वर्षाचे शिक्षण पूर्ण केल्याबद्दल अल अमीन काँलेज ऑफ फार्मसी बंगळुरू आणि राजीव गांधी विद्यापीठ आयोजित दिक्षांत समारोहा मध्ये रोहिणी ढोबळे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी प्रिन्सिपॉल एम डी सलहाउद्दीन, डाॅ.एस.सचितानंद ,डाॅ. अमरिश तुंबगी,महंमद नवाब,जुबेर अन्वर आणि अल अमीन काँलेज ऑफ फार्मसी बंगळुरूचे चेअरमन उमर खान हे होते."रुग्णालयात गर्भवती महिलांच्या प्रिस्क्रिप्शनमधील संभाव्य औषधांच्या परस्पर संवाद (interctions)वर निरीक्षणात्मक अभ्यास " हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. त्यांना प्रा. डॉ.विद्या आणि प्रा. प्रेमलता यांचे मार्गदर्शन लाभले.

डॉक्टर ऑफ फार्मसी ही पदवी विज्ञान आणि औषध वितरित करण्याची कला यांचे संयोजन आहे. 6 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर, त्यांनी औषधांचा उपचारात्मक उपचार आणि रुग्णांची सेवा, रोगाचे निदान करणे इत्यादी कौशल्य देखील अवगत केली.

         रोहीणी ढोबळे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे सरकारी शाळेत झाले आहे. बालवयात रोहिणी ला आईवडिलांच्या कडुन विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे बाळकडू मिळत गेले,आधुनिक काळात शिक्षणा शिवाय आपला उध्दार अशक्य आहे हेओळखुन शिक्षणासाठी अघोर परिश्रम घेतले. उच्च शिक्षणासाठी रोहिणी हीने बेंगलोर येथील महाविद्यालयात शिक्षण घेऊन यश संपादन केले आहे

या मिळालेल्या यशाबद्दल रोहिणी यांना विचारले असता आपल्याला आजोबा हिंदुराव कांबळे आणि आई वडिलांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे ,प्रत्येकाने डा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्राधान्य देऊन यशस्वी व्हावे असे सांगितले.सदर पदवी मिळाल्याबद्दल डा रोहिणीचे सर्वत्र कौतुक होऊन शुभेच्छेचा वर्षाव होत आहे.

थोडे नवीन जरा जुने