Top News

हेरवाड : २२ वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

शाळा, कॉलजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपआपल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र, ज्या शाळेमध्ये, ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, वेगवेगळ््या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ मात्र तशीच असते. सर्वांना एकदा भेटावे, एकमेकांशी हितगुज करावे, असे सर्वांना वाटते. मात्र २२ वर्षांचा मोठा कालखंड लोटल्या नंतर प्रत्येकजण आपआपल्या नोकरीधंद्यात व्यस्त असल्याने ते सहजासहजी शक्य होत नाही. मात्र, ते अशक्यही नसते हे हेरवाड हायस्कूल मध्ये १९९९ ते २००० साली उत्तीर्ण होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. आणि तब्बल २२ वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झाले, ज्या मातीने आपल्याला घडवलं, आयुष्य जगण्याचे तंत्र मंत्र दिले त्या भूमीत पुन्हा एकदा त्याच सवंगड्यांसह एक डाव पुन्हा मांडण्याची संधी चालून आली ती माजी विद्यार्थ्यांच्या भेटीच्या निमित्ताने.... हेरवाड हायस्कूलमधून १९९९ ते २००० या शैक्षणिक वर्षात बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी एक दोन नव्हे तर चक्क २२ वर्षांनी पुन्हा एकत्र आले. हेरवाड येथील शिवशैल्य हॉल मध्ये नुकताच माजी विद्यार्थ्यांचा अनोखा मेळावा येथे अभुतपूर्व उत्साहात पार पडला. माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी मेळाव्यास आपुलकीने उपस्थिती दर्शवत विद्यालायावरील आपले प्रेम व्यक्त केले. यानिमित्ताने जुन्या मित्रांची भेटही घडून आली. 

यावेळी शिक्षक सौ. नरुटे, एस.बी. सुतार, टी. एस. मोरडे, हातगिणे सर, किरण पाटील, बाळकृष्ण फल्ले, एम.एस. कांबळे, बारवाडे सर, ग्रंथपाल नेताजी पाटील, मुख्याध्यापिका माणिका नागावे यांच्यासह माजी विद्यार्थी संतोष पुजारी, रमजान जमादार, अमोल सुतार, अॅड. अनिरुद्ध कांबळे, चिदानंद आलासे, परशुराम आसंगे, बंडू माळी, राहुल माळी, नामदेव कांबळे, अमीर मुल्ला जहिर मुजावर, संदिप मस्के, प्रवीण माळी, दत्तात्रय पुजारी कल्पना पाटील, सिमा बंडगर, कौसर जमादार, मनिषा झुणके, सारिका बुडकर आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार रमजान नदाफ यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने