Top News

ऊस दराच्या आंदोलनात तोडगा न निघाल्यास अंकली पुलावर रास्ता रोको आंदोलन करणार : धनाजी चुडमुंगे



सुरेश कांबळे/ शिवार न्यूज नेटवर्क :

गेल्या अनेक दिवसांपासून ऊस दराचे आंदोलन सुरू आहे. ऊस दराच्या आंदोलनात तोडगा न निघाल्यास अंकली पुलावर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा धनाजी चुडमुंगे यांनी पालकमंत्री दिपक केसरकर व जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ऊस दराचे विनिमय अधिनियम 2013 व नियम 2016 नुसार साखर कारखान्यांना महसुली विभागणी सूत्रानुसार ( rsf ) देणे बंधनकारक आहे. या मधील तरतुदी नुसार जुलै अखेर सर्व साखर कारखान्यांनी आपले हिशोब साखर आयुक्तांना द्यावे लागतात व ते हिशोब तपासून ऊस दर नियंत्रण मंडळ प्रत्येक कारखान्याचा rsf ठरवते. 

साखर आयुक्तांनी दिनांक 2 मे 2022 मध्ये परिपत्रक काढून कारखान्यांना त्या फॉरमॅट मध्ये हिशोब देण्यास सांगितले होते पण आपल्या भागातील साखर कारखान्यांनी वरील तरतुदी व फॉरमॅट नुसार आपले हिशोब दिले नाहीत आणि हिशोबच न आल्याने साखर आयुक्तांना ऊस हंगाम 2021/22 चा rsf ठरवता आला नाही. 

आपल्या भागात सलग महापूर आल्याने शेतकरी मोठया आर्थिक संकटात आहे व साखर कारखान्यांना साखरेच्या वाढलेल्या दरामुळे व केंद्राच्या इथेनॉल च्या धोरणामुळे भरपूर फायदा झाला आहे. 

नवीन हंगाम सुरु होण्यापूर्वी मागील rsf शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होता तो न देता कारखाने सुरु केले आहेत हे शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणारे असून साखर आयुक्तांनी rsf ठरवला नाही म्हणून आम्ही rsf चे पैसे देणार नाही म्हणून साखर कारखाने आडमुठी भूमिका घेऊन शेतकऱ्यांचा हक्क हिराऊ पहात आहेत म्हणून आम्ही गेले दोन महिने विविध प्रकारे शेतकऱ्यांच्या मध्ये जागृती करणे आणि आंदोलन करून मागील हंगामाचे पैसे मिळावेत म्हणून प्रयत्न करत आहोत. 

मुदतीत कारखान्यांनी हिशोब न दिल्याने शेतकऱ्यांना rsf नुसार बिल मिळाले नाही व कारखान्यांनी कायद्याने जी जबाबदारी पार पाडायची होती ती कारखान्यांनी पार पाडली नाही म्हणून हा प्रश्न निर्माण झाला आहे व शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे.

या आंदोलनास साखर कारखाने जबाबदार असून आणि 

साखर आयुक्तांना प्रत्येक साखर कारखान्याचा हिशोब तपासून rsf ठरवण्यास वेळ लागणार हे ओळखूनच मागील हंगामाचा rsf मधील काही रक्कम आत्ता द्यावी व उर्वरित रक्कम आयुक्त कार्यालयाने rsf ठरवले नंतर द्यावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. तसेच राज्य शासनाच्या निर्देशानुसार हंगाम सुरु होण्यापूर्वी प्रत्येक साखर कारखान्याने चालू हंगामात दिला जाणारा ऊस दर किती असेल याची दैनिकातून जाहीर प्रसिद्धी करणे बंधनकारक आहे तशी प्रसिद्धी करून मगच हंगाम सुरु करावा अशी आमची मागणी आहे. 

वरील दोन मुद्यांच्या अनुषंगाने आपल्या नेतृत्वात साखर कारखाने प्रतिनिधी आंदोलक आणि जिल्हा प्रशासन अशी व्यापक बैठक आयोजित करून यावर रविवार पर्यंत तोडगा काढावा अन्यथा सोमवारी 7 नोव्हेंबर रोजी अंकली पुलावर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदतात म्हटले आहे.

थोडे नवीन जरा जुने