Top News

नम्रता कटारेचा शैक्षणिक साहित्य देऊन केला गौरव



दानोळी / शिवार न्यूज नेटवर्क :

          दानोळी येथील जयसिंगपूर- दानोळी रस्त्यावरील कटारे मळ्यातील कु.नम्रता कलगोंडा कटारे (इयत्ता. 9 वी) हिच्या दक्षतेमुळे व तत्परतेने तिचा चुलतभाऊ शौर्य जयकुमार कटारे वय 3 वर्ष याचे प्राण वाचले.

शौर्य व त्याचा भाऊ ओजस जयकुमार कटारे खेळत खेळत घराशेजारी असणाऱ्या विहिरीजवळ पोहोचले. नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाने विहीर तुडुंब भरली होती .नकळतपणे शौर्यचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. त्याचा भाऊ ओजस वय वर्ष 5 ओरडू लागला. घरातील इतर मंडळी कामात व्यस्त होती. नम्रताने त्याचा आरडा-ओरडा ऐकून क्षणाचा विलंब न करता धाव घेतली व पाण्यात उडी घेऊन शौर्यचे प्राण वाचवले.तिच्या या धाडसा बद्दल राज्याचे मा. राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, शिरोळ पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी ओमासे साहेब, दानोळी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. श्रेया वांजूळे प्राथमिकचे खिलारे सर, एस.पी विद्यानिकेतनचे आण्णा पोलिस पाटील तसेच मान्यवरांनी नम्रताचा शालेय साहित्य देऊन गौरव केला. यावेळी सर्वांनी नम्रताचे विशेष कौतुक केले.

थोडे नवीन जरा जुने