Top News

आंदोलन अंकुशची 20 ऑक्टोबरला शिरोळात एल्गार सभा : धनाजी चुडमुंगे यांंची माहिती


सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

आंदोलन अंकुश कडून ऊस उत्पादकांच्या न्याय हक्कासाठी गेली 5 वर्ष रस्त्यावरील व न्यायालयीन लढा सुरु आहे.दरवर्षी हंगामा च्या तोंडावर शिरोळ मध्ये एल्गार सभा घेतली जाते.यावर्षी ची एल्गार सभा गुरुवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याचे धनाजी चुडमुंगे यांनी जयसिंगपूर येथील पत्रकार बैठकीत जाहीर केले.

ऊस उत्पादकांच्या विविध प्रश्नावर आंदोलन अंकुश 2017 पासून लढा देत आहे. यामध्ये प्रामुख्याने थकीत frp वरील व्याजाचा लढा आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना न मागता एकरकमी frp मिळत आहे.त्याचबरोबर मशीन तोड वजावटीचा मुद्दा राज्य स्तरावर धोरण घेण्यास भाग पडणारा ठरला आहे.त्याच प्रमाणे frp वर परिणाम करणारा तोडणी वाहतुकीच्या खर्चाच्या बाबतीत सुद्धा गेली दोन हंगाम त्यावरील अनावश्यक खर्चावर अंकुश लावण्यात व तोडणी वाहतूक खर्च कमी करण्यात यशस्वी ठरलो आहोत असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की राज्य सरकार ने 2021 मध्ये दोन टप्यात frp चे धोरण अवलंबले होते यालाही आम्ही मुबंई उच्य न्यायालयात आव्हान दिले असून त्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस तुटल्यानंतर 14 दिवसात एकरकमी frp मिळण्याचा आणि न दिल्यास थकीत रक्कमेवर व थकीत कालावधीसाठी 15% व्याजासह frp मिळणारा संविधानिक अधिकार अबाधित रहावा म्हणून आमचा प्रयत्न आहे.

गेली 5 वर्ष फक्त हंगामाच्या तोंडावर आंदोलन न करता वर्षभर सातत्यपूर्ण पाठपुरावा करून रस्त्यावर व न्यायालयीन लढा देऊन ऊस उत्पादकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.

गेली 5 वर्षे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एल्गार सभा आम्ही शिरोळ मध्ये घेत आहोत आणि या एल्गार सभेच्या माध्यमातून ऊस उत्पादकांच्या प्रश्नांची व्यापक चर्चा करून ते सोडवण्यासाठी पुढील धोरण सर्वांच्या संमतीने ठरवले जात असते.

यावर्षी साखर कारखान्यांनी राज्य सरकार च्या धोरणाचा विचार न करता एकरकमी frp देण्याचे जाहीर केले असले तरी मागील हंगामा चा rsf ( महसुली विभागणी सुत्रा ) नुसार दुसरा हप्ता हिशोबाने द्यावा अशी आम्ही मागणी यापूर्वीच केली आहे. मागील हंगामात पूर बाधित ऊस गाळप केल्यामुळे सर्वच कारखान्यांची सरासरी रिकव्हरी कमी झाली आहे त्यामुळे मागील हंगामात शेतकऱ्यांना frp पेक्षा जादा दर मिळाला आहे.

पण मागील एकवर्ष साखरेला जादा दर मिळाला आहे व उप पदार्थाना सुद्धा चांगला दर मिळाला असल्यामुळे साखर कारखान्यांचे महसुली उत्पन्न वाढले आहे.

जादा महसुली उत्पन्नातील 70% वाटा शेतकऱ्यांना द्यावा असा कायदा असून त्याप्रमाणे गत हंगामातील उसाला जरी frp पेक्षा जादा दर दिला असला तरी तो सोडून अजून 100 रुपये दुसरा हप्ता मिळाला पाहिजे व जे कारखाने बी हेवी मोल्यासीस पासून इथेनॉल बनवत आहेत त्यांनी 200 रुपये अजून द्यायला पाहिजेत अशी आमची मागणी आहे.

सध्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऊस दर मिळण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे आणि याचा फायदा घेण्यासाठी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एल्गार सभा 20 ऑक्टोबर 2022 रोजी शिरोळ च्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात घेतली जाणार आहे.

ऊस उत्पादकांच्या हक्काच्या एल्गार सभेत येत्या हंगामा मध्ये ऊस दराबाबतीतले धोरण ठरवून त्याप्रमाणे पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. असेही त्यांनी शेवटी सांगितले. पत्रकार बैठकीस जिल्हाध्यक्ष राकेश जगदाळे, उपाध्यक्ष उदय होगले तालुका अध्यक्ष दिपक पाटील तालुका उपाध्यक्ष संभाजी शिंदे आप्पा कदम अमोल गावडे आनंद भातमरे दत्तात्रय जगदाळे आण्णासो वडगावे शशिकांत काळे उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने