Top News

उत्तम पाटील राज्यस्तरीय “कर्नाटक कायकयोगी” पुरस्काराने सन्मानित

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : 

गॅरंटी न्यूज यांच्या वतीने हुबळी येथे आयोजित भव्य कार्यक्रमात बोरगावचे युवा नेते उत्तम पाटील यांना राज्यस्तरीय “कर्नाटक कायकयोगी” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मानाबद्दल परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

बोरगाव नगरीचे भाग्यविधाते स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांच्या विचारांवर चालत, व बंधू अभिनंदन पाटील यांच्या सहकाऱ्याने सहकार, राजकारण व समाजकारण या क्षेत्रात कार्य करत असताना उत्तम पाटील यांनी अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या लोकोपयोगी कार्याची दखल घेत गॅरंटी न्यूज तर्फे दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला.

हुबळी येथील क्युबिक्स हॉटेलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात फकीरेश्वर मठ, शिरहट्टी-गदगचे पिठाधिपती फकीर दिंगालेश्वर महास्वामीजी, हुनगुंडचे आमदार व वीरशैव लिंगायत विकास निगमचे अध्यक्ष विजयानंद कासप्पणावर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

उत्तम पाटील यांच्या अनुपस्थितीत हा पुरस्कार अरिहंत को-ऑप सोसायटी लिमिटेड बोरगाव मल्टीस्टेटचे मुख्य कार्यनिर्वाहक अशोक बंकापुरे, बोरगाव पिके पीएस सोसायटीचे सीईओ विपुल चौगुले, सदलगा येथील रॉयल शोरूमचे मालक चंदू पाटील व उत्तम पाटील यांचे पी ए, श्री सचिन हंसनाळे यांनी स्वीकारला.

या कार्यक्रमास कामगार कल्याण मंत्री संतोष लाड, आमदार अभय प्रसाद, महेश टेंगिनकाई, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उत्तम पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात स्वतःला झोकून देत जनतेशी सुसंवाद साधत प्रामाणिकपणे मदत केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे बोरगावसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

थोडे नवीन जरा जुने