कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या स्पर्धेत मराठी शाळेतील विद्यार्थी टिकावेत व गावातील गरीब व बहुजन समाजातील मुलांना सेमी इंग्रजी चे शिक्षण मिळावे यासाठी विद्या मंदिर निगवे खालसा येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात यावे यासाठी गावातील पालकांनी शालेय व्यवस्थापन समितीला निवेदन दिले. यावेळी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये सर्व पालकांनी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करणेबाबत जोरदार मागणी केली.बैठकीत शाळा व्यवस्थापन समिती व सर्व शिक्षकांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासकीय पातळीवरती सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची आश्वासन दिले.
तसेच यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याबाबत शाळा व्यवस्थापने ठराव करून तो गटशिक्षणाधिकारी पाठवून लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून सर्व पालकांनी यासाठी पुढाकार घेण्याची ठरले आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू होण्याची आशा पालकांमध्ये निर्माण झाली आहे.
यावेळी चर्चेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाटील, सदस्य सतीश कांजर, सोन्या कापसे तर पालकांच्या वतीने गुरुदत्त शुगरचे जनसंपर्क अधिकारी विकास चौगले, सागर पाटील, एस.के.किल्लेदार , युवराज गोगोणें, दशरथ किल्लेदार, संदिप सोनाळकर, सचिन पाटील यांनी भाग घेतला. तर शाळेच्या वतीने मुख्याध्यापक खोत सर समीर पाटील सर, पाटील मॅडम ,कांबळे मॅडम मगदूम मॅडम , कुलकर्णी मॅडम यांनी चर्चत भाग घेऊन शाळेच्या वतीने सेमी इंग्रजी वर्ग सुरु झालेनंतर पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली.
