अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
श्रावकरत्न , स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांच्या प्रेरणेतून श्री अरिहंत रुरल डेव्हलपमेंट संचलित R. A. Patil Public School, Borgaon या शाळेने शैक्षणिक वर्ष 2025–26 मधील इयत्ता १०वी CBSE परीक्षेत उल्लेखनीय अशी १००% निकालाची कामगिरी नोंदवली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणांसह यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
या परीक्षेत प्रथम क्रमांक — सक्षम नैनेश पाटील (94.2%) द्वितीय क्रमांक — स्तवन निलेश पाटील (93.6%) तृतीय क्रमांक — अक्षय बाहुबली अम्मण्णावर (91.2%) यांनी क्रमांक पटकाविले. तसेच विशेष प्रावीण्य श्रेणीत १६ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १४ विद्यार्थी आणि द्वितीय श्रेणीत ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यश संपादन केलेल्या गुणी सर्वच विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन युवानेते उत्तम पाटील, संचालिका श्रीमती मीनाक्षी पाटील, उद्योजक अभिनंदन पाटील यांनी अभिनंदन केले व या यशासाठी प्रयत्न केलेल्या सर्वच शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी बोलतांना संचालिका श्रीमती मिनाक्षी ताई पाटील म्हणाल्या की विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण परिश्रम, चिकाटी, तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे अभूतपूर्व यश शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाप्रती दाखवलेली निष्ठा आणि अभ्यासातील जिद्द याचे हे यशस्वी फलित मानले जाते, मनात जिद्द असेल तर यश निश्चीत साध्य होते असे पाटील म्हणाल्या. यावेळी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि संस्थेच्या पदाधिकारी व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
