हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
सध्या लम्पी रोगाने सर्वत्र धुमाकूळ घातला असून या पार्श्वभूमीवर पशुधन विभागामार्फत गावामध्ये उद्या मंगळवारी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती पशुवैद्यकिय डॉक्टर पटेल यांनी दिली.
हेरवाड गावामध्ये सुमारे 573 गायींची संख्या आहे, त्यामुळे पशुवैद्यकिय डॉक्टरांच्याबरोबर खासगी डॉक्टरांचे पथक तसेच खिल्लार प्रेमीचे पदाधिकारी या माहिमेत सहभागी होणार आहे. सदरची लस प्रत्येक गायींच्या गोठयात जावून देण्यात येणार असल्याने या मोहिमेला सर्व पशुपालकांनी सहकार्य करावे असे आवाहन पशुवैद्यकिय विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे.
