हेरले / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरले ( ता. हातकणंगले) येथे पिसाळलेल्या कुत्र्याने पाच जणांना लागोपाठ चावे घेऊन जखमी केल्याने गावामध्ये एकच घबराट वातावरण निर्माण झाले.
वीरा खोचगे ( वय दीड वर्ष),सुवर्णा पाटील ( वय ६५ ) ,हर्षद चौगुले (वय ७) ,सुमन मगदूम (वय ५२) वर्ष,शिवाजी लोखंडे (वय ६०) , आदी पाच जणांना हे कुत्रे एका पाठोपाठ चावत सुटल्याने गावातील महिला व लहान मुलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या पाच जणांनी हेरले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी तात्काळ उपचार केले. सध्या गावात या पिसाळलेल्या कुत्र्याचा सुळसुळाट झाला असून नागारीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावात सकाळ पासून रंगाने काळ्या आसणाऱ्या कुत्र्याने न्यू लेटस मित्र मंडळ ,हजारी कोपरा आशा ठिकाणी पिसाळलेल्या अवस्थेत समोर येणाऱ्यांचे लचके तोडत फिरत होते. गावातील काही तरुणांनी त्याचा पाठलाग करून मारले. त्यामुळे घरातून बाहेर पडतांना सर्वांनी सावधपणे बाहेर पडावे व सतर्कता बाळगावी.तसेच गावामध्ये मोकाट कुत्र्याचा सुळसुळाट वाढला असून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ही ग्रामस्थांतून होत आहे.
