अजित कांबळे । शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव येथील समस्त गोंधळी समाजाची आराध्य दैवत श्री मरगुबाई देवीची यात्रा प्रति वर्षाच्या आषाढ श्रावण महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होत असते. या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.
अन्नदाता शेतकरी सह सर्वांची रोगराई दूर होऊन चांगला पाऊस पडावा व तसेच जनतेला सुख समृद्धी लाभावी या प्रार्थनेसाठी बोरगाव येथील आर के नगरातील समस्त गोंधळी समाजाच्या वतीने मरगुबाई यात्रेचे आयोजन करण्यात आले होते,यात्रेनिमित्त मरगुबाई चा गाडा विधिवत पूजा करून गोंधळी समाजाचे मानकरी बाबुराव वाघमोडे पाटील यांच्या हस्ते सीमेवर गाडा सोडण्याची पारंपारिक प्रथा यावेळी जपण्यात आली.
मंगळवारी देवीची विशेष पूजा करून आंबील चा नैवेद अर्पण करून संपूर्ण गावातून पुरुष महिला भक्तांच्या उपस्थितीत वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अनेक भक्तांनी नैवेद्य अर्पण करून देवीचे दर्शन घेतले. मंगळवार हा यात्रेचा मुख्य दिवस या दिवशी युवा नेते उत्तम पाटील, नगराध्यक्ष दिगंबर कांबळे ,नगरसेवक अभय मगदूम यांच्या सह मान्यवरांनि देवीच्या कार्यक्रमाला भेट देऊन दर्शन घेतले व समस्त गोंधळी समाजातील भक्तांना या यात्रेच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
यात्रा कमिटीचे प्रमुख काकासाहेब वाघमोडे,नारायण आडेकर, दादासाहेब वाघमोडे या प्रमुखांकडून उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मंगळवार रात्री जागरण निमित्ताने सुप्रसिद्ध गोंधळ नाट्याचा सदाबहार कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमास युवा नेते उत्तम पाटील, नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, नगरसेवक अभय मगदूम, शिवाजी भोरे,तुळशीदास वसवाडे ,बाहुबली सोबाने, पिंटू कांबळे, रमेश कुरळे, संगप्पा आईदमाळे, गोंधळी समाजाचे मानकरी बाबुराव वाघमोडे पाटील, सदाशिव वाघमोडे, नारायण आडेकर काकासो वाघमोडे, दादासो वाघमोडे, अमित वाघमोडे, दीपक इंगळे, सुभाष वाघमोडे, संजय वाघमोडे, सुशांत आडेकर ,सागर वाघमोडे, कुमार इंगळे, शहानुर आडेकर यांच्यासह गोंधळी समाजातील समस्त भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
