Top News

शिरढोणच्या सर्पमित्रांकडून सापांना जीवदान; नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर

 


हैदरअली मुजावर । शिवार न्यूज नेटवर्क : 

शिरढोण गावातील सर्पमित्र ओंकार सुतार, अशोक मुजगोंडा आणि ओंकार बिरोजे हे सापांचे सुरक्षित रेस्क्यू करून त्यांना जीवदान देण्याचे उल्लेखनीय कार्य करत आहेत. गावात किंवा परिसरात कुठेही साप आढळल्याची माहिती मिळताच हे तिघेही हातातील काम बाजूला ठेवून तात्काळ घटनास्थळी पोहोचतात आणि सापांना कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे पकडून योग्य अधिवासात सोडतात.

घोणस, मन्यार, नाग तसेच धामण यांसारख्या सापांचे रेस्क्यू करताना स्वतःचा जीव धोक्यात घालून ते धाडसाने हे काम करतात. त्यांच्या तत्परतेमुळे अनेक वेळा नागरिकांची भीती दूर होते, तसेच सापांचाही जीव वाचतो. वन्यजीव संवर्धन आणि जनजागृतीच्या दृष्टीने त्यांचे कार्य मोलाचे ठरत आहे.

सर्पमित्रांच्या या सेवाभावी कार्यामुळे शिरढोण गावात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली असून नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. साप दिसल्यास त्यांना न मारता प्रशिक्षित सर्पमित्रांना माहिती देऊन सुरक्षित रेस्क्यू करून घ्यावे, असे आवाहनही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

थोडे नवीन जरा जुने