Top News

दानोळीत शादीखाना हॉलसाठी २५ लाखांचा निधी ; आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते पायाखुदाई



दानोळी । शिवार न्यूज नेटवर्क :

 दानोळी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून देणारे आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या शादीखाना हॉलसाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२५-२६ अंतर्गत २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या हॉलचा पाया खुदाई शुभारंभ आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.

यावेळी बोलताना आमदार डॉ. यड्रावकर यांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाला प्राधान्य देणे हीच आपली भूमिका असल्याचे सांगितले. दानोळी गावाच्या विकासासाठी आजपर्यंत सुमारे १२ कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक इमारती, सामाजिक सभागृहे आणि इतर मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत. मुस्लिम समाजासाठी उभारण्यात येणारा शादीखाना हॉल हा सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुस्लिम समाजाच्या वतीनेही आमदार डॉ. यड्रावकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या हॉलमुळे विवाह सोहळे, सामाजिक कार्यक्रम तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध होणार असल्याने मुस्लिम समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला. 

या शुभारंभ कार्यक्रमास पै.केशव राऊत, महादेव धनवडे, बादशहा जमादार, बापूसाहेब दळवी, गुंडू दळवी, धन्यकुमार पाराज, परशुराम सावंत, पिंटू पाराज, अमिर घुणके, असिफ तांबोळी, विकास वाळकुंजे, उदय राऊत, पै. सुकुमार सकाप्पा, जे. एन. पाटील, सतिश मलमे, सोमा माने, प्रकाश माने, संजय परमाप्पा, बबन भोसले, शाकीर तांबोळी यांच्यासह ग्रामस्थ आणि मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने