कुरुंदवाड । शिवार न्यूज नेटवर्क :
: शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथील व्ही.के. फोटोग्राफी स्टुडिओसमोर उभी केलेली सुमारे 70 हजार रुपये किमतीची सुझुकी अॅक्सेस 125 स्कूटर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पांडुरंग खोत (वय 27, व्यवसाय – फोटोग्राफर, रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
21 जुलै रोजी रात्री 10 ते 22 जुलै रोजी पहाटे 2 वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. फिर्यादी यांच्या मालकीची पांढऱ्या रंगाची सुझुकी कंपनीची अॅक्सेस 125 स्कूटर (क्रमांक MH-09-GQ-6376) व्ही.के. फोटोग्राफी स्टुडिओसमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय ती लबाडीच्या हेतूने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चोरीस गेलेल्या स्कूटरची किंमत सुमारे 70 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. फिर्यादीच्या तक्रारीवरून कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस नाईक पवार यांनी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार कोळी करीत आहेत.
