शिरोळ । शिवार न्यूज नेटवर्क :
येथील पोलीस ठाण्यास नूतन पोलीस निरीक्षक म्हणून प्रमोद शिंदे यांनी पदभार स्वीकारला आहे.पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे हे वडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होतो. त्यांची शिरोळ पोलीस ठाण्याकडे बदली करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे हे मुंबई इचलकरंजी यास अन्य पोलीस ठाण्यामध्ये काम केले आहेत.शिरोळ पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांची छत्रपती संभाजी नगर राजगुप्तहेर उपायुक्त पदी पदोन्नतीपर बदली झाली आहे. शिरोळ पोलीस ठाण्याकडे बरेच दिवस अधिकाऱ्याविना हे पद रिक्त होते. पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.
