Top News

विवाहितेचा छ्ळ ; पती, सासू, सासरे व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल

 


जयसिंगपूर । शिवार न्यूज नेटवर्क : 

विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू, सासरे आणि नणंदेविरुद्ध जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वैष्णवी सम्राट पोतदार (वय 31) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 14 जुलै 2024 पासून ते 24 मे 2026 पर्यंत जयसिंगपूर येथील सासरी राहत असताना पती सम्राट सुहास पोतदार, सासरे सुहास मुरलीधर पोतदार, सासू सुहासिनी सुहास पोतदार व नणंद स्वप्नगंधा पोतदार यांनी वारंवार मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी मारहाण करून शिवीगाळ केली, जेवण न देणे, माहेरून चारचाकी वाहन व 5 लाख रुपये आणण्याची मागणी करणे, तसेच गरम उलथण्याने चटके देऊन त्रास दिल्याचे म्हटले आहे. तसेच चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक त्रास दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक 266/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 85, 115(2), 352 व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ. कुलकर्णी करीत आहेत. एस के न्यूज जयसिंगपूर


थोडे नवीन जरा जुने