Top News

घरफोडी करून ७३ हजारांचा ऐवज लंपास; जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल

 


 जयसिंगपूर । शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील कवठेसार येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ७३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक महादेव दळवी (वय ६३, रा. विठ्ठल मंदिरामागे, कवठेसार, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. दि. २१ जुलै २०२६ रोजी रात्री ११.०० वाजल्यापासून ते २३ जुलै २०२६ रोजी पहाटे ४.४५ वाजेपर्यंत अज्ञात चोरट्यांनी घराच्या पुढील दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातील लोखंडी व लाकडी तिजोरी उघडून सोन्याचे दोन पदरी बोरमाळ (अंदाजे ७ ग्रॅम), चांदीचे दोन ब्रेसलेट (अंदाजे १० भार) तसेच ओप्पो कंपनीचा CPH2753 मॉडेलचा 'Sunset Peach' रंगाचा मोबाईल असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

या प्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

थोडे नवीन जरा जुने