Top News

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक लोकसंख्या दिन साजरा

 


शेडशाळ । शिवार न्यूज नेटवर्क :

न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे आनंददायी शनिवार अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आले.सर्वप्रथम सहाय्यक शिक्षिका धनश्री पोवार यांनी अतिशय सुरेल आवाजात सुंदर प्रार्थना व गीते विद्यार्थ्यांना सांगितली.त्यानंतर जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला.

विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री मनोज पासोबा यांनी लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या वाढीची कारणे,त्यांचे दुष्परिणाम व त्यावरील उपाय याबद्दल दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे देऊन या दिवसाचे महत्त्व विषद केले.यानंतर सहाय्यक शिक्षक श्री रियाज जमादार यांनी फुटबॉल पटू रोनाल्डो यांच्याबद्दल माहिती दिली व रोनाल्डो च्या जीवनातील फुटबॉल संदर्भात अनेक उदाहरणे व माहिती सांगितली.त्यानंतर श्री संतोष माने यांनी शालेय जीवनात शिस्तीचे पालन करणे कीती आवश्यक आहे हे सांगीतले.यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची पालक सभा घेण्यात आली.यावेळी सहाय्यक शिक्षक श्री शितल हळींगळे व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल व शालेय कामकाजाबद्दल तसेच पालकांच्या शंकांचे निरसन केले.अशाप्रकारे मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविले गेले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हजर होते.

थोडे नवीन जरा जुने