Top News

शिरढोण-कुरुंदवाड पुलावरील जलपर्णी हटविण्यासाठी प्रगतशील शेतकरी अनिल शिंदे यांचे निःस्वार्थ योगदान


 

हैदरअली मुजावर । शिवार न्यूज नेटवर्क :

शिरढोण-कुरुंदवाड पुलावर मोठ्या प्रमाणात साचलेल्या जलपर्णीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल शिंदे यांनी कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता स्वतः पुढाकार घेत जलपर्णी हाताने काढण्याचे निःस्वार्थ काम केले.

त्यांच्या या समाजहिताच्या कार्यामुळे पुलावरील अडथळा दूर होण्यास मदत झाली असून वाहनचालक व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. समाजाप्रती असलेली त्यांची तळमळ आणि सेवाभाव याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

श्री. अनिल शिंदे यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल शिरढोण गावातील नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या समाजसेवेला सलाम केला आहे. अशा निःस्वार्थ सामाजिक कार्यातून इतरांनाही प्रेरणा मिळावी, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

थोडे नवीन जरा जुने