इसाक नदाफ । शिवार न्यूज नेटवर्क :
इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून नशिले मेन्टरमाईन सल्फेट टर्मिन इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या एकास अटक केली.
निखिल शंकर पाटील (वय २३) राहणार यशवंत कॉलनी इचलकरंजी असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून इंजेक्शनच्या १० मिलीच्या ५१ बाटल्या आणि मोबाईल असा ३० हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आले.
नशिले इंजेक्शन विक्रीसाठी एकटा येणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार यशवंत कॉलनी परिसरातील पाटील मळा ते कबनूर मार्गावर सापळा रचला होता. यावेळी संशयावरून निखिल पाटील यांच्याकडील पिशवी तपासले असता त्याच्याकडे मेन्टरमाईन सल्फेट टर्मिन या नशीला इंजेक्शनच्या १० मिलीच्या ५१ बाटल्या मिळून आल्या. त्यामुळे त्या बाटल्या आणि त्याच्याकडील मोबाईल असा ३० हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाटील याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता १ दिवस पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास सहायक उपनिरीक्षक अनिल चव्हाण हे करत आहेत. पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत सद्दाम सनदी, गणेश सनदी, शिरीष कांबळे, तुषार सूर्यवंशी, प्रमोद चव्हाण, विकास चौगुले, मनीषा माळी हे सहभागी झाले होते.
