Top News

वाढदिवसाचा आनंद समाजसेवेतून; विनोद मगदूम यांच्या उपक्रमाचे कौतुक

 


जयसिंगपूर । शिवार न्यूज नेटवर्क :

वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छा, केक आणि उत्सव नव्हे, तर समाजातील गरजूंच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याची संधीही असते, याची प्रचिती जयसिंगपूर येथील बारावी गल्लीतील मगदूम ज्वेलर्सचे मालक विनोद मगदूम यांनी आपल्या कृतीतून दिली.

आपला वाढदिवस त्यांनी सामाजिक उपक्रमांनी साजरा करत दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्याचे वाटप केले. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना शैक्षणिक साहित्य व आवश्यक वस्तूंचे वितरण करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावला. या उपक्रमामुळे अनेक गरजूंना मदतीचा आधार मिळाला, तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंदही फुलला.

'समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे, त्यामुळे समाजाप्रती काहीतरी देणं लागतो,' या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून समाजसेवेचा संदेश देणाऱ्या विनोद मगदूम यांच्या कार्याचे उपस्थितांनी विशेष अभिनंदन केले.

यावेळी भास्कर शेट्टी, प्रशांत शिंदे, संतोष शेट्टी, राजू आरबाळे, आनंदराव चौगुले, संजय चौगुले, शफी मुजावर, सलीमभाई आदी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने