हेरवाड । शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने हेरवाड - अब्दुललाट रस्ता पाण्याखाली गेला आहे.
पंचगंगा, वारणा, दूधगंगा, या नद्यांची पाणी पातळीही वाढली आहे. पंचगंगा नदीला पूर आल्याने तेरवाड, शिरोळ व राजापूर हे तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच कोथळी - समडोळी, दतवाड व कर्नाटकला जोडणारे बंधारे याचबरोबर कुरूंदवाड-शिरढोण, हेरवाड- अब्दुललाट रस्त्यावरही पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. तालुक्यात संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात तसेच सांगली, सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील संततधारेने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. सध्या प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
